Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : “संस्कृती संवर्धनात ग्रंथालयांचा मोलाचा वाटा!” – साहित्यिक श्रीकांत चौगुले

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 October 2023, 16:19

प्रदीप गांधलीकर
Pimpri News : पिंपरी, ता.१४ : “गेल्या शतकात ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची जडणघडण झाली, ती मोठी माणसे ज्ञानसाधनेतून मोठी झाली. त्यामुळे लोकजीवनात आणि संस्कृती संवर्धनात ग्रंथालयांचा मोलाचा वाटा आहे!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी व्यक्त केले.

ग्रंथालयांचा मोलाचा वाटा

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेल्या वाचनप्रेरणा दिन पिंपरी येथील संत तुकारामनगर जवळ असलेल्या सोहम् सार्वजनिक ग्रंथालयात कार्यक्रमाचे शनिवारी (ता. १४) आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात श्रीकांत चौगुले बोलत होते. माजी महापौर योगेश बहल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच संत तुकाराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम, पुणे जिल्हा ग्रंथालय निरीक्षक श्रीकांत संगोपाग, तांत्रिक साहाय्यक प्रमोद ढगे, ज्येष्ठ साहित्यिक धनंजय कुलकर्णी, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक -युवती आणि शालेय विद्यार्थी लक्षणीय संख्येने श्रोत्यांमध्ये उपस्थित होते.

श्रीकांत चौगुले पुढे म्हणाले की, “ग्रंथातील ज्ञान सर्वांना अवगत व्हावे म्हणून पूर्वीपासून ग्रंथपारायणाची आपल्या संस्कृतीत परंपरा आहे. वाचनातून अनेक महनीय व्यक्ती घडल्या असल्याचे त्यांच्या चरित्रवाचनातून आपल्या लक्षात येते. भौतिक साधनांच्या उपलब्धतेसाठी आणि मानसिक उन्नयन व्हावे म्हणून आजची तरुणाई पुस्तकांसह वेगवेगळ्या माध्यमातून वाचन करीत असते; परंतु अभ्यास आणि अर्थाजन या उद्देशाने वाचन करीत असतानाच निखळ आनंदासाठी ललितग्रंथांचे वाचन केले पाहिजे. उत्तम वाचक जीवनात कधीही पलायनवाद स्वीकारत नाही. याशिवाय पुस्तक वाचनातून एका आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याची अनुभूती घेता येते!”

 

यावेळी वाचनचळवळ वृद्धिंगत होण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. योगेश बहल यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “वाचनातून माणसाला परिस्थितीशी संघर्ष करण्याची जिद्द आणि चालना मिळते!” असे मत मांडले.

दरम्यान, जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून १९९० सालापासून कार्यरत असलेल्या तसेच सद्यस्थितीत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सुमारे २६००० ग्रंथसंपदा असलेल्या सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना ग्रंथालयाच्या सुसज्ज अभ्यासिकेचा लाभ घेऊन आजतागायत अनेक विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी झाले आहेत, या गोष्टीचे समाधान आहे, अशी भावना व्यक्त केली. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post
Pune prime news first column panchama will publish on 07 am today

आता सर्वसामान्यांच्या प्रत्येक समस्येचा होणार 'पंचनामा'; पुणे प्राईम न्यूजचं नवंकोरं सदर उद्यापासुन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.