Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : ‘बकुळगंध’ हा अभूतपूर्व ग्रंथ! : डॉ. पी. डी. पाटील यांचे गौरवोद्गार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 13 October 2023, 12:53

Pimpri News : पिंपरी : अपरिमित श्रमाने सिद्ध झालेला ‘बकुळगंध’ हा अभूतपूर्व ग्रंथ आहे. यानिमित्ताने शांताबाईंच्या कविता सर्वदूर पोहोचल्या आणि त्यांना खरोखरच न्याय मिळाला, असे गौरवोद्गार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी काढले.

तृतीय आवृत्तीचे प्रकाशन

निगडी प्राधिकरण येथील संत तुकाराम संकुलातील शांता शेळके सभागृहात गुरुवारी (ता. १२) काढले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मिती करण्यात आलेल्या ‘बकुळगंध’ या शांता शेळके जन्मशताब्दी ग्रंथाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन करताना डॉ. पी. डी. पाटील बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.(Pimpri News)  तसेच अक्षरवेध परिवाराचे अध्यक्ष मकरंद बापट यांच्यासह साहित्य, संस्कृती आणि समाजकारण या क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. प्रकाशनापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या शांता शेळके सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी गिरीश प्रभुणे म्हणाले की, बालपणापासून शांताबाईंच्या कविता अंतर्मनात खोलवर रुजल्या आहेत. त्यामुळे ‘बकुळगंध’ हा अंतर्बाह्य देखणा ग्रंथ वाचताना शांताबाई अखंडपणे सभोवती रुंजी घालत राहतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा वर्धिष्णू व्हावी, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेने स्वतःचे कार्यालय उभे करावे, ही ऐतिहासिक घटना आहे. कार्यकारिणीच्या अखंड ध्यासातून हे साध्य झाले असून, त्याला दातृत्वशक्तीचा भक्कम पाठिंबा लाभला आहे. शांताबाई हे मराठी साहित्यातील लखलखते काव्यनक्षत्र होते, असे मत व्यक्त करीत त्यांनी शांता शेळके यांच्या व्यक्तिगत आणि साहित्य कर्तृत्वाचा लालित्यपूर्ण आलेख मांडला. (Pimpri News) अनुराधा मराठे यांनी आपल्या मनोगतातून शांता शेळके यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या शीघ्रकवित्वाचा दाखला म्हणून त्यांनी केवळ दहा मिनिटांत रचलेल्या मंगलाष्टकांचे सादरीकरण केले. तसेच रसिकांच्या आग्रहास्तव “ही वाट दूर जाते…” या गीताचे सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

 

दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राजन लाखे यांनी प्रास्ताविकातून ‘शांता शेळके सभागृह’ मिळविण्यासाठी कार्यकारिणी आणि हितचिंतक यांनी केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली; तसेच शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सिद्ध केलेल्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची निर्मितीप्रक्रिया कथन करताना साहित्य, संगीत, नाट्य, समाजकारण, राजकारण या क्षेत्रातील सुमारे १०० मान्यवरांच्या ग्रंथातील सहभागाविषयी रंजक आठवणी कथन केल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभापासून ते समारोपापर्यंत रिचा राजन आणि डॉ. गिरीश रांगणेकर यांनी शांता शेळके लिखित गीतांचे सुरेल सादरीकरण करीत रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. (Pimpri News) महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा कार्यकारिणी आणि अक्षरवेध परिवाराने संयोजनात परिश्रम घेतले. संजय जगताप यांनी उद्घाटन सत्राचे तसेच श्रीकांत चौगुले यांनी उर्वरित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी शेठ यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : आज फक्त रुग्णवाहिकेची काच फोडली; उद्या तुझ्या पप्पाना फोडून काढेल ; अशी धमकी देत लग्नास नकार देणाऱ्या तरुणीचा विनयभंग;

Pimpri News : जुन्या वादातून दोघांवर धारदार शस्त्राने वार ; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर, निगडीतील घटना..

Pimpri News : कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस गळती; २२ जणांना श्वासाचा त्रास; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

Yavat News : बैलपोळा सणावर यंदा दुष्काळाचे सावट; रंगीबेरंगी साहित्याने यवत बाजारपेठ सजली; परंतु मागणीत घट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.