Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस गळती; २२ जणांना श्वासाचा त्रास; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 October 2023, 11:22

Pimpri News : पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी मध्यरात्री अवैधरित्या गॅस भरताना नऊ सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना ताजी असतानाच महानगरपालिकेच्या जलतरण तलावात मंगळवारी धक्कादायक घटना घडली. कासारवाडी येथील जलतरण तलावातून अचानक क्लोरीन गॅस लिकेज झाला. यामुळे तलावात पोहण्यासाठी आलेल्या २० ते २२ जणांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. परिसरात क्लोरीन गॅस पसरल्याने काही मीटरपर्यंत नागरिकांना खोकला आणि घसा दुखीचा त्रास सुरू झाला. काही नागरिकांना तर श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कासारवाडी येथील स्विमिंग पूलाच्या समोरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, जलतरण तलावात उतरलेल्या आणि जास्त त्रास होत असलेल्या नागरिकांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जास्त त्रास होत असलेले नागरिक रुग्णालयात दाखल

पिंपरी-चिंचवडमधील मनपाच्या कासारवाडी जलतरण तलावात नेहमी अनेक जण पोहण्यासाठी येत असतात. मंगळवारी सकाळी अनेक जण पोहण्याचा आनंद घेत होते. त्यावेळी अनेकांना अचानक श्वास घेण्याचा त्रास सुरु झाला. तसेच खोकला येऊ लागला आणि गळ्याचा त्रास होऊ लागला. (Pimpri News) जलतरण तलावच नाही तर या परिसरात ५०० मीटर पर्यंत लोकांना हा त्रास सुरु झाला. जलतरण तलावातील क्लोरीन गॅस लिक होऊन परिसरात पसरला होता. परिसरातील नागरिकांना त्रास सुरु होताच या परिसरातील रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला.

 

तलावातून क्लोरीन गॅस लिक झाल्यामुळे या ठिकाणी असलेल्या २० ते २२ जणांना तसेच सुरक्षारक्षकांना त्रास सुरु झाला. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले. (Pimpri News) त्यांनी संबंधित व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. ११ जणांना उपचारासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.

जलतरण तलावात फिल्टर प्लँट आणि बॅलन्सिंग टाकी असते. फिल्टर प्लँट आणि क्लोरिन प्लँट जवळजवळ असतात. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरिनचा वापर करतात. परंतु हे क्लोरिन किती सोडावे याचे प्रमाण ठरले असते. क्लोरिन सोडल्यानंतर तो बॅलन्सिंग टाकीतून मिसळतो.(Pimpri News)  त्यानंतर हे पाणी फिल्टर प्लँटमध्ये जाते. त्यानंतर पाणी जलतरण तलावात सोडले जाते असते. या पद्धतीत पिंपरी चिंचवडमध्ये कुठे बदल झाला हे आता चौकशीनंतर समोर येणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : ताथवड्यातील गॅस स्फोट प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल; तिघे पोलिसांच्या ताब्यात

Pimpri News : आरोग्यमंत्र्यांनी पोलिसांना घेतले फैलावर; ताथवड्यातील गॅस स्फोटप्रकरणी ४ पोलिसांना निलंबनाची तंबी

Pimpri News : पिंपरीचे माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Daund News : वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण, शिवीगाळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.