विशाल कदम
Breaking News : पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्हयात घरफोडी, जबरी चोरी, मोक्का यांसारखे गंभीर स्वरूपाचे तब्बल ५३ गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.
अरमान प्रल्हाद नानावत (वय-२४, रा. वढु खु, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून तब्बल १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
स्पोर्ट्स बाईकवर करायचा गुजराथ, मध्यप्रदेश प्रवास
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरमान नानावत हा स्पोर्ट बाईकचा वापर करतो, मोटार सायकलचा वापर करून गुन्हे करतो, आणि मोटार सायकलवरच गुजरात, मध्यप्रदेश असा प्रवास करायचा.(Breaking News) त्यामुळे आरोपीला पकडण्यासाठी सलग १३ दिवस पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले.
दरम्यान, आरोपी अरमान नानावत हा कोरेगाव भिमा परीसरात आला आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. (Breaking News) मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.
आरोपी अरमान नानावत याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने शिरुर शहरात दोन महिलांचे गळयातील दागिने चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. (Breaking News) आरोपी कडून सुमोर तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड सुनावली आहे. (Breaking News) पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करीत आहेत.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, प्रदीप चौधरी, सहाय्यक फौजदार हनुमंत पासलकर, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार विजय कांचन, राजु मोमीण, अतुल डेरे, विक्रम तापकीर, राहुल घुबे, पोना समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, निलेश सुपेकर, प्रमोद नवले, दगडू विरकर यांच्या पथकाने केली आहे.