लोणी काळभोर, (पुणे): दौंड-पुणे लोहमार्गावरील थेऊर फाटा परीसरात एका अज्ञात व्यक्तीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. 26) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. रेल्वेच्या खाली उडी घेतल्याने त्याचे शरीराचे दोन भाग झाले. सदर व्यक्तीचा चेहरा विद्रूप झाला असून लोणी काळभोर पोलिसांना ओळख पटविण्यात मोठी अडचण येत असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर व्यक्तीचे वय 40 ते 45 असून त्याचे नाव व पत्ता अद्याप समजू शकले नाही. कारणामुळे आत्महत्या केली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. रेल्वेखाली एकाने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेश करे व पोलीस शिपाई खराडे, रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव अद्याप समजू शकले नसून या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आत्महत्याग्रस्त व्यक्तीला पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून लोणी काळभोर पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु केली आहे.