Mumbai News : मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून कोकणात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गुरुवारी (ता. २७) दुपारी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळी मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात येणार आहे. तर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून वाहतूक सुरूच राहणार आहे.
मुंबईच्या दिशेने वाहतूक राहणार बंद
एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्यानंतर तीन दिवसांपूर्वी येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरड हटवण्यासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. आता २७ जुलै रोजी दुपारी १२ ते दोन वाजेपर्यंत मुंबई एक्सप्रेस वे बंद असणार आहे. अद्याप एक्सप्रेस वेवर काही ठिकाणी दगड अडकले आहेत. (Mumbai News) ते धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे असे दगड काढण्यासाठी मार्गिका दोन तास बंद ठेवली जाणार आहे.
एक्सप्रेस वे वर २३ जुलै रोजी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. या वेळी दगड-मातीचा ढिगारा महामार्गावर आला होता. (Mumbai News) बोरगाट महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पुन्हा बंद ठेवला जाणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. गेल्या सहा दिवसांपूर्वीच मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. (Mumbai News) त्यानंतर प्रशासनाने तिकडे धाव घेत रस्ता मोकळा केला होता. पण त्यावेळी वाहतूक ठप्प झाली होती. आता अशीच घटना रत्नागिरी–हातखंबा मार्गावरील निवळी घाटात घडली असून, वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम असल्याने आज सकाळी दरड कोसळली. ती दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर सध्या ही दरड हटवण्याचं काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : मुंबईत कंत्राटी पोलीस भरती होणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…
Mumbai News : ट्रकचालकाचा बदला घेण्यासाठी दूचाकीस्वाराने उडवली पोलिसांची झोप; आता खातोय जेलची हवा!
Mumbai News : धक्कादायक; ४ मुलींचा ६० हजारांत सौदा; नवी मुंबईत ऑनलाइन सेक्स रॅकेट उद्ध्वस्त!