Lonikand News : लोणीकंद, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगार दुकानदाराला धारदार शस्त्राने जखमी करुन जबरदस्तीने चोरी करणा-या टोळीचा टोळी प्रमुख व त्याचे इतर दोन साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Mokka action against the gang that robbed a scrap shopkeeper in Lonikand..)
टोळी प्रमुख तानाजी अर्जुन जाधव (वय – २२, रा. लाडवा वस्ती, वाबळे यांचे गाईच्या गोठया शेजारी, केसनंद ता. हवेली) रोहित राजु माने, (वय – २१, गुजरवाडी, निंबाळकर वस्ती, खोपडे नगर, दत्त मंदीराचे पाठीमागे कात्रज) व ओमकार नरहरी आळंदे (वय २१, रा. वडगाव रोड, बालाजी वस्ती, केसनंद, ता. हवेली) अशी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. (Lonikand News )
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळी प्रमुख तानाजी अर्जुन जाधव व त्याचे इतर दोन साथीदार इसम यांनी लोणीकंद केसनंद रोडवरील भंगार विक्रेत्याला एकटे गाठुन जबरदस्तीने पैशाची मागणी केली असता तक्रारदार यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्या तिघांनी संगनमत करुन तक्रारदार यांना जखमी करुन त्यांचे खिशातील रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली होती. (Lonikand News ) याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अपर पोलीस आयुक्तांनी दिले आदेश
टोळीचा म्होरक्या म्हणून तानाजी जाधव याने स्वत:ची व टोळीची दहशत निर्माण केली होती. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेळोवेळी टोळीतील सदस्यांवर कारवाई केली. (Lonikand News ) तरीदेखील त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात फरक न पडल्याने पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी या टोळी विरुद्ध तडीपार करण्यासंदर्भातचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे रंजन कुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.
दरम्यान सदर प्रस्तावाची छाननी करुन सदर तीन आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Lonikand News ) पुढील तपास पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव हे करीत आहे.
सदरची कामगिरी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस ठाण्याचे गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, रामकृष्ण दळवी व सर्व्हेलन्स पथकातील पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी केली आहे. (Lonikand News )
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Lonikand Crime : केसनंद येथील तरूणाला धारदार शस्त्राने जखमी करून लुटणार्या दोघांना बेड्या…