लोणी काळभोर : थेऊर (ता.हवेली) परिसरात खुलेआम सुरु असलेल्या हातभट्टी विक्रीच्या धंद्यावर लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी (ता.13) सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेऊन सुमारे 3 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे. भारती विक्रम कसबे (वय 35, रा.थेऊर, ता.हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत सुतार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार प्रशांत सुतार हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी कर्त्यव्य बजावीत होते. तेव्हा थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरा नगर कॉलनीच्या परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा दारू विक्री चालू आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा भारती कसबे या हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू विक्री करताना आढळून आल्या. पोलिसांनी या कारवाईत एका प्लॅस्टीक कॅन्डमध्ये हातभट्टीची सुमारे 30 लिटर दारू पकडली असून तिची बाजारात अंदाजे 3 हजार रुपये इतकी किंमत आहे. तर आरोपी महिला भारती कसबे यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुंबई प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार चंद्रकांत माने करीत आहेत.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलिस हवालदार, चंद्रकांत माने, विजय जाधव, विशाल बनकर, पोलिस अंमलदार प्रशांत सुतार, तौफिक सय्यद, प्रसाद ताम्हाणे, महिला पोलिस सरिता जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.