Loni Kalbhor News : लोणी काळभोर : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, महसूल विभाग, महावितरण व पोलिस प्रशासन अशा सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. (Loni Kalbhor, Kadamwakwasti Gram Panchayat ready for Jagadguru Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony)
उद्या पालखी लोणी काळभोर येथे येणार
पुणे शहरातील मुक्काम संपवून ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी (ता. १४) लोणी काळभोर येथे मुक्कामी येणार आहे. (Loni Kalbhor News) लोणी काळभोर ग्रामपंचायतीने गावातील मुख्य चौक, रस्ते, बाजारतळ, पालखीतळ, जिल्हा परिषद शाळांचा परिसर, उद्यान, स्मशानभूमी परिसर व विठ्ठल मंदिर परिसराची स्वच्छता केली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांसाठी स्मशानभूमी परिसरात तात्पुरती फिरती शौचालये उभारली असून, वारकऱ्यांना पिण्याचे व शौचालयांसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन केले आहे.
याबाबत बोलताना लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर म्हणाले की, “वारकऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीतळ, आठवडा बाजार मैदान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, गावठाण परिसर, गावातील प्रमुख रस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे मैदान, कन्या प्रशाला, मराठी शाळेचे मैदान व गावातील सर्व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली आहे. सर्व ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. डासांच्या निर्मूलनासाठी फाॅगिंग मशीनच्या माध्यमातून धूरळणी करण्यात येत आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतीअंतर्गत “हरितवारी” उपक्रमासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड म्हणाले की, “पालखी तळ, एंजल हायस्कूल व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालय या तीन ठिकाणच्या आरओ प्लॅन्टमधून वारकऱ्यांना पिण्यासाठी मोफत पाणी पुरवण्यात येणार आहे. पुणे-सोलापूर महामार्गालगत कचरा कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. (Loni Kalbhor News) तसेच आरोग्यविषयक स्टॉल लावण्यात येणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहाची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे.
आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दगडू जाधव म्हणाले की, घरगुती व सार्वजनिक पाणीसाठ्याची तपासणी करून आवश्यक त्याठिकाणी मेडीक्लोर हे औषध टाकण्यात आले आहे. डासांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी धुरळणी करण्यात आली आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, विठ्ठल मंदिर या ठिकाणी वारकऱ्यांवर मोफत उपचारासाठी तात्पुरती मदत केंद्रे चालू करण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने एक कर्मचारी नेमण्यात आला आहे. माहितीसाठी फलक लावले आहेत.
आरोग्य केंद्रातील ८ वैद्यकीय अधिकारी, ५ आरोग्य सहाय्यक, १२ आरोग्य सेवक व २५ आशा स्वयंसेविका, ६ आरोग्यसेविका पथकाच्या माध्यमातून वारकऱ्यांना उच्च दर्जाची तातडीची आंतररूग्ण व बाह्यरूग्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी १०८ च्या २ तसेच १०२ च्या ५ रुग्णवाहिकांबरोबर ५ कार्डियाक रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यात आले आहे. (Loni Kalbhor News) तसेच प्रत्येक दिंडीप्रमुखास औषधोपचार किट देण्यात येणार आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने पालखी सोहळ्याच्या काळात कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचन (ता. हवेली) दरम्यान वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, स्वयंसेवक, एन.एस.एस., ग्रीन फिल्ड व पोलीस मित्र संघटना सज्ज झाल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले.
– पालखी सोहळ्यादरम्यान अत्यावश्यक सेवांसाठी उपलब्ध यंत्रणा व संपर्क क्रमांक
* कदमवाकवस्ती ग्रामविकास अधिकारी, अमोल घोळवे- ८०१३०१०७०७
* सरपंच, चित्तरंजन गायकवाड-९९२२९०३६९५
* लोणी काळभोर सरपंच, योगेश काळभोर- ९९७५५८७७७७
* लोणी काळभोर पोलीस ठाणे- ८९९९५४०७२८
* प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी, डॉ. दगडू जाधव- ९८२२८९५३४५
* महावितरणचे प्रभारी अधिकारी, संजय पोफळे- ७८७५७६७७३०
* वायरमन, अमोल शेलार- ८९८३०६३६३६
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर…