नारायणगाव : आळेफाटा, नारायणगाव परिसरात पार्क केलेल्या मालवाहतुक वाहनांच्या बॅटरी चोरण्याचा घटनांमध्ये वाढ झाली होती. अशातच मालवाहतुक वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्यास जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून ४ लाख ४४ हजार ४०० रुपये किमतीच्या २८ बॅटरीसह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बैटरी चोरीच्या गुन्हयांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः या गुन्हांचा आढावा घेऊन एक तपास पथक नेमण्यात आले होते. सदर पथकाने गुन्हयाची वेळ व ठिकाण याची माहिती घेत सदरचा गुन्हा करणारा व्यक्ती हा एकच असून गुन्हयाच्या ठिकाणी एक सिल्वर रंगाची अल्टो कार चारचाकी वाहन येत आहे व बैटरी चोरी करून त्याच बाहनातून बैटरी नेली जात आहे अशी माहिती तपासात पुढे आली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने तपास चालू केला असता सदर गुन्हयातील वाहन हे केतन रोहीदास विभाटे (रा. धालेवाडी ता. जुन्नर जि. पुणे) हा वापरत आहे अशी माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्याचा शोध घेत असताना तो दि. १५ जानेवारी रोजी नारायणगाव परिसरातील कोल्हेवाडी रोड येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा लावून त्यास कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याला नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव केतन रोहीदास विधाटे (वय २४ वर्षे रा. धालेवाडी ता. जुन्नर जि. पुणे) असे असल्याचे सांगितले.
तसेच त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता, त्याने एकूण ७ गुन्हे केल्याचे सांगितले व गुन्हयातील चोरी केलेल्या २८ बैटरी त्याचेकडील कारमध्ये मिळून आल्या. गुन्हा करताना वापरलेली चारचाकी अल्टो कार व २८ बैटरी असा एकूण ४ लाख ४४ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपी केतन विधाटे यास मुद्देमालासह पुढील तपास कामी नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्य ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.