Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : दसऱ्याची खरेदी करून घरी निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकची धडक; जागीच ठार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 October 2023, 11:05

दीपक खिलारे

Indapur News  : इंदापूर : दसऱ्यासाठी झेंडूची फुले आणि इतर साहित्याची खरेदी करून घरी निघालेल्या दूचाकीस्वाराला पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने दूचाकीचालक दशरथ मारुती चोरमले (वय अंदाजे ५० वर्षे, रा. काळके वस्ती, गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. २४) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इंदापूरनजीक पुणे-सोलापूर महामार्गावरील दुर्गेश्वरी हॉटेल आणि चैतन्य हॉटेलच्या दरम्यान घडली. ऐन दसऱ्यादिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दशरथ चोरमले नेहमीप्रमाणे सकाळी दूध विक्री करण्यासाठी इंदापूर शहरात आले होते. दूध विक्री करून, तथा दसरा साजरा करण्यासाठी फुले व आवश्यक वस्तू घेऊन ते आपल्या दुचाकीवरून (एम एच ४२ सी ५६०४) घरी निघाले होते. (Indapur News ) त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने (एम एच ३२ ए जे ९२७३) त्यांना चिरडले. हा अपघात एवढा भयानक होता की, दुचाकीस्वाराच्या मेंदूसह शरीराचे अवयव घटनास्थळी अक्षरशः विखुरले होते. अपघातानंतर त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूही रस्त्यावर विखुरल्या होत्या. या घटनेनंतर ट्रकचालक पसार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

 

दरम्यान, घटनेनंतर घटनास्थळी १५०-२०० नागरिक जमा झाले. या वेळी संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला. इंदापूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (Indapur News ) त्यानंतर इंदापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन व कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याने अग्निशमन गाडी पाचारण केली. अग्निशमन दलाने काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत ट्रकचे मोठे नुकसान झाले.

राजवर्धन पाटील यांनी केले चोरमले कुटुंबाचे सांत्वन
अपघाताच्या दुर्दैवी घटनेमुळे चोरमले कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. (Indapur News ) मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या आरोपीला मोठी शिक्षा झाली पाहिजे, असे ते या वेळी म्हणाले. राजवर्धन पाटील म्हणाले की, सण व उत्सवाच्या काळात चोरमले कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने या कुटुंबाला द्यावी.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Indapur News : निरा-भिमा कारखान्याचे ६ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : हर्षवर्धन पाटील; बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात

Indapur News : मायलेकींचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू ; पतीला नातेवाईकांना दिला चोप

Indapur News : इंदापूर तालुक्यासाठी निरा डावा व खडकवासला कालव्यातून रब्बीसाठी २ आवर्तने : हर्षवर्धन पाटील

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Bhor News : निगडे येथे पुढाऱ्यांना गावबंदी अन् मतदानावर बहिष्काराचा मराठा समाजाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.