Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : निरा-भिमा कारखान्याचे ६ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : हर्षवर्धन पाटील; बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 October 2023, 18:19

दीपक खिलारे

Indapur News : इंदापूर : निरा भिमा कारखान्याकडून आगामी गळीत हंगामामध्ये ६ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याची गळीत हंगामासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (ता. २३) दिली.

दिवाळीसाठी एक पगार बोनस

शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी-प्रदीपन समारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाला. या वेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, निरा-भिमा कारखान्याचे गेली २३ वर्षांमध्ये या परिसराच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे. (Indapur News) गत हंगामासाठी कारखान्याने शेतकऱ्यांना २,५०० रुपयांप्रमाणे ऊस बिलाची सर्व रक्कम दिली आहे. कारखान्याच्या देय एफ.आर.पी.पेक्षा ही रक्कम २१३ रुपये एवढी जास्त आहे. आगामी गळीत हंगामात साखर उतारा वाढीसाठी शेती विभागाने ऊस तोडणीचे योग्य नियोजन करावे. आगामी गळीत हंगामासाठी काटा पेमेंट करण्याचे नियोजन आहे. कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला नियमित होत असून, दिवाळीसाठी एक पगार बोनस दिला जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगितले.

 

उपस्थितांचे स्वागत कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी केले. तर प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले. (Indapur News) याप्रसंगी सत्यनारायणाची महापूजा संचालक हरिदास घोगरे व वृंदावना घोगरे या उभयतांच्या हस्ते करण्यात आली.

या वेळी विलास वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रताप पाटील, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, बबन देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार या संचालकांसह देवराज जाधव, सुरेश मेहेर आदी मान्यवर तसेच अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Indapur News : मायलेकींचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू ; पतीला नातेवाईकांना दिला चोप

Indapur News : इंदापूर तालुक्यासाठी निरा डावा व खडकवासला कालव्यातून रब्बीसाठी २ आवर्तने : हर्षवर्धन पाटील

Indapur News : ‘कर्मयोगी’ व ‘निरा भिमा’कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी २५ लाखांचा धनादेश

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
CM devendra Fadanvis shares important information about jalgaon railway accident

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार: देवेंद्र फडणवीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.