इंदापूर : इंदापूर तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी दि.21 रोजी इंदापूर येथील नवीन नगरपालिकेच्या इमारती शेजारील भव्य मैदानावरती दुपारी २ वाजता भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रवीण पवार व पवनराजे घोगरे यांनी माहिती दिली.
मंगळवारी (दि.१७) इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी इंदापूर तालुका सकल मराठा समाजाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत उपरोक्त माहिती दिली.
यावेळी या सभे करीता होणारा खर्च इंदापूर सकल मराठा समाज स्व-इच्छेने देणगी देऊन करणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक बांधव सभेसाठी ग्राऊंड तयार करण्याकरीता लागणारे ट्रॅक्टर, जीसीबी मशीन स्वखर्चाने मोफत देणार आहेत. तसेच मंडप, साऊंड सिस्टिम, स्टेज खर्च मराठा बांधव करणार आहेत.
जरांगे पाटील यांच्यावर फुले उधळण्याकरीता जेसीबी व फुले मोफत देणार असून तसेच सभेसाठी येणार्या कार्यकर्तांना लागणारे बिसलरी पाणी मोफत देण्याची जबाबदारी मराठा बांधवांनी स्विकारली आहे. सभेसाठी येणार्या बांधवांना इंदापूर डॉक्टर मेडीकल असोशियन तसेच अँब्युलंन्स सेवा देणार आहेत .
या सभेकरीता येणार्या वाहनांकरीता शहरात चार ठिकाणी पार्कीग व्यवस्था करण्यात येणार आहे.तसेच सभेचे व्यवस्थापन व नियोजन व्यवस्थीत पणे व्हावे या करीता २०० स्वयंसेवक सेवा करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
या सभेस माहिला व पुरुष बांधकांनी सभेकरिता मोठ्या संख्येने यावे असे आवाहन इंदापूर तालुका सकल मराठा संघाच्या वतीने करण्यात आले आहे. आरक्षण आंदोलन आणि त्यावरुन सरकारची झालेली कोंडी, तसेच जरांगे पाटील यांनी नुकतीच घेतलेली विराट मराठा सभा यामुळे इंदापूर तालुक्यात होणाऱ्या या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.