उरुळी कांचन, (पुणे) : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झालेल्या आंदोलकांसाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील हॅप्पी ग्रुपच्या वतीने ‘मदत नव्हे कर्तव्य’ या भावनेतून अर्धा लिटर बिस्लेरी पाण्याचे 500 बॉक्स वाटप करण्यात आले.
सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रेच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील त्यांच्याबरोबर लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरून मुंबईकडे जात आहे. मुंबईकडे जात असताना जागोजागी खाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ आणि चहापाण्याचे स्टॉल्स् लावण्यात आले होते.
आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो ‘मदत नव्हे कर्तव्य’ या भावनेतून कोरेगाव मूळचे माजी सरपंच विठ्ठल शितोळे, सोरतापवाडीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब चौधरी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप शितोळे, उद्योजक संदीप गायकवाड, डॉ. नितीन चौधरी, गणेश चौधरी, बाळासाहेब शिंदे, गोरख कड, गोरख कामठे, अतुल सावंत-इनामदार, चंद्रकांत गिराम, शुभम काळे, संकेत वाघ आदी ग्रुपच्या सदस्यांनी अर्धा लिटर बिस्लेरी पाण्याच्या 500 बॉक्सचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, उरुळी कांचन येथील हॅप्पी ग्रुपचे सदस्य नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होऊन काम करतात. आता त्यांनी मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांचे बुधवारी पुणे शहरात आगमन झाल्यावर घोषणांच्या निनादात जल्लोषात स्वागत केले.