Hadapsar News | पुणे : गुढीपाडवा सणानिमित्त आज शहरातील हडपसरमध्ये अनेक सामाजिक संघटनांनी शोभा यात्रेसह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हडपसर (Hadapsar News), ससाणे नगर, हांडेवाडी, सातववाडी,गाडीतळ आदी परिसरातून वाजत गाजत व ढोल ताशांच्या गजरात शोभा यात्रेने चैतन्य निर्माण केल्याचे यावेळी दिसून आले.
कार्यक्रमात सातववाडी येथील शिवसमर्थ व सिद्धेश्वर संस्थेने आंतरराष्ट्रीय भरड वर्षानिमित्त भरड धान्य गुढी शोभायात्रेद्वारे भरडधान्याचे आहारातील महत्त्व विशद केले. या शोभायात्रेत विद्यार्थ्यांचे लेझीम पथक विशेष आकर्षण होते. कार्यक्रमाचे आयोजन मनीषा वाघमारे, पार्थ वाघमारे व डॉ. शंतनू जगदाळे यांनी केले.
शेकडो महिला सहभागी…
दरम्यान जनसेवा न्यास यांच्यावतीने ससाणे नगर ते डीपी रोड अशी महिलांची दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. रॅलीचे आयोजन माधव राऊत, भूषण तुपे,चेतन कुलकर्णी आदींनी केले तर, गाडीतळ ते गोंधळेनगर या मार्गावरून हिंदू नववर्ष स्वागत समिती, हडपसर यांनी शोभायात्रेचे आयोजन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रथ हे या शोभायात्रेच्या आकर्षण होते. या शोभायात्रेचे आयोजन मनोहर देशमुख यांनी केले.
सकल हिंदू समाज व श्री प्रभू राम भक्त मित्रपरिवार यांच्यावतीने श्रीराम मंदिर काळेपडळ ते सातव नगर अशी शोभायात्रा काढण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.
तसेच कलाकार गुढी आयोजन समितीच्या वतीने कलाकार गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हडपसर भाजी मंडई ते विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह या मार्गावर ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Hadapsar Good News : हडपसर रेल्वे स्टेशनवर ;हुतात्मा एक्स्प्रेस;सह आणखी चार ;एक्स्प्रेस;ना थांबा..!
Big Breaking : पुणे-सोलापूर डेमू ट्रेन आता हडपसरहून सुटणार..!
हडपसर टर्मिनल येथून रेल्वे गाड्या वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन