कोथरूड(पुणे): महाराष्ट्र पोलिस आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकारी असल्याचे भासवून सायबर फसवणूक करणाऱ्यांनी कोथरूड येथील एका ७० वर्षीय वृद्धाची फसवणूक करून तब्बल २.५ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. वृद्धाचे नाव “नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात” सामील असल्याचे सांगून वृद्धाला पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पाडण्यात आले. हि घटनेत १९ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान महिलेने ७४ व्यवहार केले आणि फसवणूक करणाऱ्यांना २.५ कोटी रुपये हस्तांतरित केले. दरम्यान, वृद्धाला आपली फसवणूक झाल्याचे कळले तेव्हा त्यांनी सायबर गुन्हे शाखेत धाव घेत संपूर्ण प्रकार सांगितला.
काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या
नाशिक पोलिस असल्याचे भासवून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नाशिकमधील एका बँक खात्याचा गैरवापर झाला असून, ते खाते जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात वापरले गेले आहे. असे सांगण्यात आले. दरम्यान, महिलेला घाबरवण्यात आले, तिला भीती दाखवण्यात आली, मग आरोपीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर वृद्ध महिलेने दिले, त्यात त्यांनी त्यांचे बँक क्रमांक आणि इतर महत्वाचा तपशील आरोपीला सांगितला.
वृद्ध महिलेलानंतर आणखी एक व्यक्तीचा फोन आला त्याने गंगापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी असल्याचे सांगून महिलेला मदत करण्यासाठी फोन केला असल्याचे सांगितले. दरम्यान, महिलेने आरोपीवर विश्वास ठेवत संपूर्ण माहिती सांगितली. आरोपींनी प्रकरण खरे वाटावे म्हणून वृद्ध महिलेला ED अधिकाऱ्यांच्या नावाने एक नोटीस पाठवण्यात आली होती. ती ‘डिजिटल अटकेत’ असल्याचे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले होते. आणि त्यांना दर 2 तासाला एक सेल्फी पाठवा असे आदेश नोटीस मध्ये देण्यात आले होते.
महिलेला विश्वास बसावा म्हणून बनावट अधिकृत कागदपत्रे आणि ईमेल्सही पाठवण्यात आले होते. महिलेला तिच्या खात्यातील पैसे ‘सरकारी खात्यात तात्पुरते पाठवावे लागतील असे सांगून संपूर्ण ठेवी दुसऱ्या खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आले, असे केल्यास तुम्ही निर्दोष आहे असे स्पष्ट होईल असे आरोपींनी महिलेला पटवून दिले. महिलेने ७४ व्यवहार केले आणि फसवणूक करणाऱ्यांना २.५ कोटी रुपये हस्तांतरित केले.
दरम्यान, आरोपींचे कॉल आणि मेल येणे बंद झाले, महिलेने तिचे पैसे परत मागितले तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.