लहू चव्हाण
पाचगणी : पाचवड – पाचगणी रस्त्याच्या खचलेल्या साईड पट्या अर्धवट नाले, तर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली वृक्षवेली यामुळे रस्ता अपघाताचा धोका वाढला आहे. ही कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी बेलोशी परिसरातील वाहनचालक करीत आहेत.
पाचवड – पाचगणी रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. त्याचबरोबर हा रस्ता पाचगणी – महाबळेश्वर या पर्यटन स्थळी जातो. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
या रस्त्याची ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी साईडपट्टया गायब झाल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे झुडपे अपघातांना निमंत्रण देत आहेत. सबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशी व वाहनचालक करीत आहेत.
बेलोशी(ता.जावली) व परिसर हा ह.भ.प. दत्तात्रय कळंबे महाराज यांची कर्मभूमी आहे. त्यांनी राजपुरी- काटवली -दापवडी- मेढा मार्गे करहर प्रती पंढरपूर दिंडी सोहळ्याची सुरुवात केली. करहर- पाचगणी रस्त्याच्या साईडपट्टया गायब झाल्याने वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
-शंकर बेलोशे, ग्रामस्थ बेलोशी