गणेश सुळ
Daund News : केडगाव : मराठा समाजातील तरुण, महिला तसेच ज्येष्ठांकडून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दौंड तालुक्यातील विविध गावांमधील मराठा समाजाकडून अनेक गावांतून आरक्षण मिळेपर्यत राजकीय पुढाऱ्यांना बंदीचे फ्लेक्स लावण्यात आले असून, साखळी उपोषण देखील सुरू करण्यात आले आहे. खुटबाव, देलवडी, यवत, पिंपळगाव या गावात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.
आरक्षण मिळेपर्यत राजकीय पुढाऱ्यांना बंदी
मराठा कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून लाक्षणिक साखळी उपोषण देलवडी गावात नवीन संचलित व्यापारी संकुल येथे सुरू आहे. (Daund News ) या वेळी ‘एक मराठा, लाख मराठा, ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘आरक्षण आमच्या बापाचे, नाही कुणाच्या बापाचे’, इत्यादी घोषणा देऊन उपोषणकर्ते पाठिंबा देत होते.
साखळी उपोषणास सकाळी १० वाजता सुरू झाले. यासाठी देलवडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना निवेदन देण्यात आले. (Daund News ) या उपोषण व कडकडीत बंद प्रसंगी गावातील सर्व सकल मराठा बांधव, धनगर, मातंग, चांभार, ब्राम्हण, मुस्लिम अशा विविध जाती-धर्मातील लोक एकत्रितपणे मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला खंबीरपणे साथ देत सहभागी झाले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : मराठा आरक्षणासाठी खूटबाव येथे लाक्षणिक साखळी उपोषण
Daund News : माजी आमदार काकासाहेब थोरात यांच्या पुण्यस्मरणार्थ केडगाव चौफुला येथे विविध कार्यक्रम
Daund News : मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल