Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 October 2023, 16:50

Daund News : दौंड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक गावोगावी साखळी उपोषण करत आहेत. अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे. असे असतानाही आरक्षणावर अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला खडसावले आहे. ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले असून, त्या माध्यमातून मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार का? असा संतप्त सवाल विचारला आहे. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे. ते हक्क त्यांना मिळायलाच पाहिजेत, ओबीसी आणि आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर अशा अनेक समाजांना आरक्षण देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलावं आणि आदेश काढावा

दौंडच्या दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी हे पत्रक वाचून दाखवले. राऊत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळत असतील, तर महाराष्ट्रातील सामाजिक एकतेसाठी हे बाधक आहे. (Daund News) मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं, त्यासाठी जरांगे पाटील उपोषण करत आहेत. तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी लोकं आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार काहीच करत नाही. फक्त योग्यवेळी आरक्षण देऊ ही त्यांची भाषा आहे. सरकार मन की बात करत आहे. पण त्यांचं मन निर्दयी आहे का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

जरांगे पाटील यांचे प्राण वाचावेत हेच आमचे मत आहे. राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलावं आणि आदेश काढावा. (Daund News) शिवसेना फक्त समन्वयाची भूमिका घेत आहे. शिवसेनेला वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडू नये, असा इशाराच त्यांनी दिला.

दरम्यान, दौंड दौऱ्यामध्ये संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत. आम्ही मराठा आंदोलकांसोबत आहोत. (Daund News) आम्ही राजकारण करत नाही. कुणाला राजकारण करायचं असेल, तर ते मराठा समाजाशी करत आहेत. मराठा आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांची जबाबदारी जास्त आहे, असेही राऊत म्हणाले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : राहू बेटात कामाच्या शोधात हंगामापूर्वीच ऊस तोडणी कामगाराचे जत्थे दाखल

Daund News : पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; दोन प्रवाशी जागीच ठार, १८ गंभीर

Daund News : देवीची मिरवणूक, जागरण गोंधळ अन् दीपोत्सव; दौंड तालुक्यात नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गतिमंद महिलेला घरात ओढलं अन् अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी; पुणे येथील घटना

Thursday, 16 April 2026, 9:52

निदा खानच निघाली मास्टरमाईंड! नाशिक धर्मांतर प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संशयाने खळबळ

Thursday, 16 April 2026, 9:33

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी लवकरच निवडणूक; भाजपमध्ये इच्छुकांची रांग तर मविआसमोर मतांच्या जुळवाजुळवीचं ‘टेंशन’

Thursday, 16 April 2026, 9:20

मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो म्हणत अनेकांची फसवणूक; संगमनेरचा भोंदूबाबा चर्चेत

Thursday, 16 April 2026, 9:02

अयानसह 6 जणांना बेड्या, 18 अश्लील व्हिडिओ जप्त; अमरावती अत्याचार प्रकरणी मोठी कारवाई

Thursday, 16 April 2026, 8:43

Maharashtra Weather: महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला, हवामान विभागाकडून कडक उन्हाचा इशारा

Thursday, 16 April 2026, 8:22
Next Post

Nagar News : मंदिरातील त्रिशूळ चोरणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांकडून अटक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.