संदीप टूले
Daund News दौंड : केडगाव येथील ‘एक हात मदतीचा फाऊंडेशन’ सामजिक बांधिलकी जपणारा उपक्रम आहे. (Daund News) हा उपक्रम गेली 8 वर्षे राबविला जात असून, ज्यांना आई-वडील नाही, अनाथ आहेत अशा गरजू विद्यार्थ्यांना या फाऊंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य देण्यात येते. (Daund News)
यंदा या फाऊंडेशन वतीने केडगाव परिसरातील जवळपास 32 अनाथ मुलांना मदत देण्यात आली. तसेच मागील काही दिवसांपूर्वी या ग्रुपने ऊसतोड महिलांसाठी 200 साड्यांचे वाटप केले होते.
असा काम करतो हा ग्रुप
केडगाव येथील धनराज मासाळ यांनी सोशल मीडियावर सामाजिक कार्यासाठी ‘केडगाव हेल्प’ नावाने ग्रुप बनवला आहे. या ग्रुपमध्ये जवळपास 680 सदस्य असून, अशा सामाजिक कार्यासाठी या ग्रुपवर मदतीसाठी आवाहन केले जाते. यातून मिळणारी मदत ही पैशाच्या स्वरूपात, शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात स्वीकारली जाते. त्याचे योग्य नियोजन करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जाते. तसेच त्यांनी केलेल्या सामाजिक कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.