Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणी ससूनचे माजी वैद्यकीय अधीक्षक अजय तावरे ताब्यात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 29 May 2025, 11:06

पुणे : पुणे शहरात 2022 मध्ये गाजलेल्या किडनी रॅकेट प्रकरणी एक खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.या रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांचा सहभाग असल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं. त्यानंतर आता या प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.किडनी रॅकेट प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आज अजय तावरेला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक अजय तावरेचा सहभाग असल्याने समोर आल्यानंतर त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. अजय तावरेला या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तावरे सध्या पोर्शे अपघात प्रकरणात गेल्या वर्षभरापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

कोल्हापूरमधील एका महिलेला कथितपणे १५ लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आले होते. तिने एका प्रत्यारोपणाची गरज असलेल्या पुरुषाची पत्नी असल्याचे खोटे भासवले आणि एका तरुण महिला रुग्णाला आपली किडनी दान केली. त्याच्या बदल्यात त्या तरुण महिलेच्या आईने त्या पुरुषाला किडनी दान केली होते.२९ मार्च २०२२ रोजी, ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाल्यानंतर चार दिवसांनी, संबंधित महिलेने पैशांवरून झालेल्या वादानंतर आपली खरी ओळख उघड केली. त्यामुळे रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी ही घटना आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिली.

 

तावरे याची किडनी प्रत्यारोपणात मुख्य भूमिका आहे. तावरे याला किडनी देणारे आणि किडनी घेणारे हे दोघेही बनावट आहेत हे माहिती होते. तावरे यानेच त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी किडनी देताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. डॉ. तावरे हा तेव्हा रिजनल ऑथरायझेशन कमिटीचे अध्यक्ष असल्याने त्याने बनावट कागदपत्रांना मान्यता दिली असल्याचे नमूद करण्यात आले होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31
Next Post

खळबळजनक! पुण्यात आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp