Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 16 October 2026, 20:40

मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसाअभावी उभी पिके करपू लागली आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन देणगी म्हणून देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पत्रही दिले होते. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे. या निधीचा वापर मदतकार्यासाठी केला जाणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे संबंधित तालुक्यांमधील शेतकऱ्यांना विविध शासकीय सवलतींचा लाभ मिळणार आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती अशा उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत. तसेच कृषी पंपांच्या वीजबिलात नियमानुसार सूट देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या ३०५ तालुक्यांमध्ये तातडीने पीक पंचनामे सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून त्याची माहिती संकलित केली जाणार आहे.

सर्वेक्षणादरम्यान पिकांच्या स्थितीची छायाचित्रे आणि संबंधित क्षेत्राचे जीपीएस निर्देशांक नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर संपूर्ण अहवाल कृषी आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. या प्रक्रियेतून दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती सरकारला उपलब्ध होणार आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागांमध्ये पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत.

1. जमीन महसुलात सूट देण्यात येणार.
2. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार.
3. शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती देण्यात येणार.
4. साडेसात अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात नियमानुसार सूट मिळणार.
5. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार.
6. रोजगार हमी योजनेच्या कामांचे निकष शिथिल करून अधिक कामे उपलब्ध करून दिली जाणार.
7. गरजेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार.
8. टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये कृषी पंपांची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही.
9. शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्याची कमतरता भासू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार.
10. जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची व्यवस्था केली जाणार.
11. दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाची कामे हाती घेतली जाणार.
12. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह पशुधनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येणार.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीचे नुकसान, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लक्षात घेता सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे. अशा परिस्थितीत आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतकार्यास हातभार लागणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आता ट्रॅफिकचा त्रास विसरा! पुणे मेट्रो लाईन-3 अखेर सुरू होणार; 3 नोव्हेंबरला उद्घाटन, ‘या’ तारखेपासून करता येणार प्रवास

Saturday, 31 October 2026, 22:08

‘दहा रोहित पवार आले तरी माघार नाही’; उजनी प्रकल्पावरून सचिन कल्याणशेट्टी आक्रमक

Saturday, 31 October 2026, 20:27

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

Saturday, 31 October 2026, 20:12

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सर्वज्ञ कांचनला कांस्यपदक; उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या श्रेया कांचनचा उत्स्फूर्त सहभाग

Saturday, 31 October 2026, 19:27

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गुपचूप उरकलं लग्न; पत्रकार निधी राजदान यांच्याशी केला विवाह

Saturday, 31 October 2026, 19:22

दौंडमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, थेट पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

Saturday, 31 October 2026, 18:36
Next Post

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; 'या' IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp