उरुळी कांचन, ता. 31 : पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा 2026-27 मध्ये स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या सर्वज्ञ राजेंद्र कांचन याने कांस्यपदक पटकावले. तर अकॅडमीच्या श्रेया स्वरूप कांचन हिनेही स्पर्धेत सहभाग नोंदवत अकॅडमीचे प्रतिनिधित्व केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. 28) हिंजवडी येथील विठ्ठल लॉन्स, लक्ष्मी चौक येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वज्ञने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक मिळवले.
सर्वज्ञच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या श्रेयाचेही कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक, कराटे प्रशिक्षक आणि पालकांकडून मिळणारे मार्गदर्शन व सहकार्य यामुळे क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, सर्वज्ञच्या पदकप्राप्तीबद्दल अकॅडमीचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि क्रीडाप्रेमींनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








