Sunday, November 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील कंपनीत 5 लाखांची चोरी, शिक्रापूर पोलिसांनी थेट हरियाणातून आरोपीला पकडलं; दोन जणांना ठोकल्या बेड्या

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 1 November 2026, 20:17

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथील कंपनीतून सुमारे 5 लाख रुपये किमतीचे सर्व्हे मशिन चोरी करणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी दोन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. यातील एका आरोपीला हरियाणा राज्यातून, तर दुसऱ्याला पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीच्या मुद्देमालापैकी 3 लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

डिंग्रजवाडी येथील इगवुड प्रा. लि. स्कॅलार स्पेसेस या कंपनीत जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणारे सर्व्हे मशिन ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी कंपनीतून हे मशिन चोरून नेले होते. या घटनेनंतर संग्राम शामराव मोरे (वय 44, रा. चिखली प्राधिकरण, चिंचवड, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम 334(1), 305, 317(2), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

या चोरीचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. त्यातून हरी किशन जाटो (वय 24, रा. जोधपूर, राजस्थान) याला हरियाणातून, तर अफाकजुद्दीन मुंताजिमुद्दीन काझी (वय 36, रा. खडकी) याला विश्रांतवाडी, पुणे येथून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान दोघांनीही चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारच्या अन्य चोरीच्या घटना केल्या आहेत का, याचा पोलीस तपास करत आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार अजित इंगवले करीत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यातील कंपनीत 5 लाखांची चोरी, शिक्रापूर पोलिसांनी थेट हरियाणातून आरोपीला पकडलं; दोन जणांना ठोकल्या बेड्या

Sunday, 1 November 2026, 20:17

दरीत कोसळली कार, समोर होतं मृत्यूचं संकट; पुण्यात एका झाडाने तिघांना दिलं जीवदान; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 1 November 2026, 19:21

Pune News: एकामागून एक 8 चोऱ्या; अखेर दोन आंतरराज्यीय चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, 5.50 लाखांचा माल जप्त

Sunday, 1 November 2026, 18:54

शिक्षणात आघाडी, तरी नोकरीत सुरक्षिततेचा पत्ता नाही; पुण्यातील तरुणांसमोर नेमकं कोणतं संकट? धक्कादायक वास्तव उघड

Sunday, 1 November 2026, 18:28

गोव्याच्या सहलीने फोडलं बिंग! ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पा ऐकल्या अन् पुण्यात तरुणांनी आखला लुटीचा कट; पुढे जे केलं ते पाहून पोलीसही चक्रावले

Sunday, 1 November 2026, 18:22

कामावर जाण्यासाठी निघाली अन् काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं; फुरसुंगीतील तरुणीचा अपघातात मृत्यू

Sunday, 1 November 2026, 18:01
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp