नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रसिद्ध पत्रकार निधी राजदान यांच्याशी विवाह केला आहे. 31 ऑक्टोबर रोजी दोघांनी सोशल मीडियावर आपल्या लग्नाची माहिती आणि एकत्रित फोटो शेअर केले. या बातमीनंतर राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रासह सोशल मीडियावरही त्यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर निधी राजदान यांच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले. दुसरीकडे, निधी राजदान यांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत विवाहाची बातमी जाहीर केली. 30 ऑक्टोबर रोजी हा विवाह झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
या विवाहाची चर्चा होण्यामागे ओमर अब्दुल्ला यांचा पहिला विवाह 1994 मध्ये पायल अब्दुल्ला यांच्याशी झाला होता. मात्र, अनेक वर्षांपासून दोघे वेगवेगळे राहत होते. अखेर जुलै 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने परस्पर संमतीने त्यांचा घटस्फोट मान्य केला. या दोघांना दोन मुले आहेत.

निधी राजदान या प्रसिद्ध पत्रकारांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक वर्षे वृत्तवाहिन्यांमध्ये काम केले असून राष्ट्रीय राजकारण आणि महत्त्वाच्या घडामोडींवर वार्तांकन केले आहे.

ओमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांच्या विवाहामुळे दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात चर्चेत असून अनेकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.







