Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 16 October 2026, 20:54

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले हे या चौकशी आयोगाचे अध्यक्ष असणार आहेत. आयोगाला अधिसूचना जारी झाल्यापासून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

औषध निरीक्षक, गट-ब, गट-क, कृषी सेवा आणि अभियांत्रिकी सेवांसह एकूण नऊ परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची चौकशी केली जाणार आहे. प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका किंवा त्यातील काही भाग फुटल्याच्या आरोपांचा तपास आयोगाकडून करण्यात येईल.

या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसेच सदस्य यांच्या भूमिकेचीही तपासणी केली जाणार आहे. याशिवाय पेपरफुटीशी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि इतर व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी होईल. दोष सिद्ध झाल्यास संविधानाच्या कलम ३१७ अंतर्गत कारवाई करण्याबाबत शिफारस करण्याची जबाबदारीही आयोगावर सोपवण्यात आली आहे.

निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या आयोगात निवृत्त न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यासह पाच सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे, गणेश पाटील आणि लखामी गौतम यांचाही आयोगात समावेश असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

 

या आयोगाच्या माध्यमातून परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आयोगाच्या अहवालानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

MPSC परीक्षांमधील पेपरफुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी सुमारे दहा दिवस आंदोलन केले.

विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढाकार घेतला होता. चौकशी आयोग स्थापन करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आणि विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले होते.

विवेक भीमनवार रजेवर असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या वतीने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.

दरम्यान, औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात आयोगातील काही अधिकाऱ्यांना अटक झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणामुळे MPSC परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता नव्याने स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाच्या अहवालाकडे विद्यार्थी आणि परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14
Next Post

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp