संदीप टूले
Daund News : केडगाव : दौंड तालुक्यातील माजी आमदार सहकारमहर्षी काकासाहेब थोरात यांनी आपला प्रपंच सावरता सावरता हजारो कामगारांचे संसार उभे केले. अन्यायपिडीत व शोषित कामगारांना ताठ मानेने जगायला शिकवले. आजही दौंड तालुक्यातील अनेक घरांमध्ये, ऑफिसमध्ये त्यांचे फोटो पाहायला मिळतात. अशा युग पुरुषाचा २२ वा पुण्यस्मरण सोहळा बोरमलनाथ मंदिर येथे रविवारी (दि.२९) पार पडला.
अनेक आठवणींनी उजाळा
यावेळी त्यांच्या आठवणींना अनेक मान्यवरांनी उजाळा दिला. या कार्यक्रमावेळी जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे म्हणाले की, काकासाहेब थोरात हे दौंड तालुक्याचे भूषण होते. (Daund News) त्यांनी अनेक दीनदुबळ्याचे संसार उभे केले. अनेकांचे त्याकाळी अश्रू पुसण्याचे काम त्यांनी केले. तसेच त्यांनी उभ्या केलेल्या बोरमलनाथ ट्रस्टने आजपर्यंत १०,००० लग्न सोहळ्याचा टप्पा पार केला. परंतु त्यांचे सदकार्यची महिमा लोकांपर्यंत पोहोचण्यास जरासा विलंब लागला.
तसेच माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, दौंडच्या काकासाहेब यांनी मुंबईमध्ये जाऊन आमदारपद भूषवले. ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. (Daund News) आपल्या ग्रामीण भागातील कामानिमित गेलेल्या आसंख्य गोर गरीबांचे मुंबई मधील एकमेव आधार बनले. त्यांना तिथे आपल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. आमदार राहुल कुल म्हणाले की, काकासाहेबाना जाऊन २२ वर्ष झाली. पण त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाला उपस्थित आलेले नागरिक यावरून त्यांनी त्याकाळी केलेले कार्य किती महान असेल. त्यांनी दौंडचे नाव पूर्ण महाराष्ट्रभर पोहचविण्याचे काम केले.
दौंड तालुक्याला त्याकाळी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यांचे कार्य आज आनंददादा आणि सदानंद यांनी पुढे चालू ठेवले आहे. (Daund News) कार्यक्रमाच्या शेवटी काकासाहेब थोरात यांच्या दोन्ही मुलांनी बोरमलनाथ गोशाळा येथे चाऱ्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करत काकासाहेबाना आदरांजली वाहिली.
यावेळी दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, भाजपा तालुकध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, संचालक विकास शेलार, बाळासाहेब तोंडे, पांडुरंग मेरगळ, वैशाली नागवडे यासह दौंड तालुक्यातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल
Daund News : राहू बेटात कामाच्या शोधात हंगामापूर्वीच ऊस तोडणी कामगाराचे जत्थे दाखल
Daund News : पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; दोन प्रवाशी जागीच ठार, १८ गंभीर