गणेश सुळ
केडगाव : येथील संतराज महाराज पालखी सोहळा बुधवार दिनांक 14 जून रोजी 1 वाजता पंढरीकडे रवाना होईल. या संतराज महाराज पालखी सोहळा रथ ओढण्याचा मान वाळकीचे माझी सरपंच कै.किसान पंडोबा थोरात यांच्या स्मरणार्थ संतराज महाराज संस्थानचे उपाध्यक्ष बाळासाहेब थोरात व त्यांचे बंधू संजय थोरात यांच्या राजा -पोपट या बैलजोडीला मिळाला आहे.
वाळकीच्या या थोरात बंधूंना पालखी रथ ओढण्याचा मान
प्रतिवर्षी परिसरातील पारगाव , देलवडी, पिंपळगाव ,वाळकी, रांजणगाव, व नागरगाव या सहा गावापैकी एका गावाला पालखी रथ ओढण्याचा मान दिला जातो. (Daund News) यावेळी वाळकीच्या या थोरात बंधूंना पालखी रथ ओढण्याचा मान मिळाला आहे.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात,सुरेश महाराज साठे,वैशाली नागवडे,दिलीप हंडाळ, रामभाऊ जगताप, अशोक कोठारी, यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करण्यात आले. थोरात बंधूंनी ही बैलजोडी जमखंडी कर्नाटक येथील लक्ष्मण बल्लाप्पा आरबावी व पांडुरंग शेठ यांच्याकडून तीन लाख पंचाहत्तर हजार रुपयांनाखरेदी केली आहे.(Daund News) यावेळी संतराज महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश महाराज साठे म्हणाले की एकादशी दिवशी (बुधवार) दिनांक 14जून रोजी दुपारी 1 वाजता पंढरीकडे मार्गस्थ होईल.हे सोहळ्याचे 56 वे वर्ष असून परिसरातील दहा हजार पेक्षा जास्त वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमालानिखिल तांबे, भाऊसाहेब भोसले,शिवाजी वाघोले,नारायण जगताप, सुदाम कोंडे, शरद शेलार,सुभाष बोत्रे सयाजी ताकवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News :चौफुला येथे पकडला ६३ हजार किंमतीचा गांजा; चार जणांना अटक, यवत पोलिसांची कारवाई