Big News : देऊळगाव राजे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी देऊळगाव राजे व पंचक्रोशीतील गावांनी संपूर्ण दिवस गाव बंद ठेवले आहे. सकाळी घोषणा देत, गावातून मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र येऊन आरक्षणप्रश्नी लवकरच तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा मोर्चाला पाठिंबा
दौंड येथे चालू असलेले साखळी उपोषण व राजाभाऊ कदम यांच्या उपोषणाचा चौथा दिवशी असल्याने, बाईक रॅली काढून या उपोषणास पाठिंबा देण्यात आला.(Big News ) दस्तगिर इनामदार यांनी देऊळगाव राजे मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा मोर्चाला पाठिंबा देत उपस्थिती दर्शवली आणि आंदोलनकर्त्यांना प्रोत्साहन दिले.
मराठा आरक्षण मिळावे यासाठी देऊळगाव राजे ग्रामपंचायतीचे सदस्य व माझी उपसरपंच बाबू नारायण पासलकर यांनी सदस्यपदाचा राजीनामा देत, सरकारचा निषेध केला. (Big News ) दरम्यान, आरक्षणाची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आजी-माजी आमदार, खासदार व नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : भरदिवसा तेलंगणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर..आरोपीला अटक