Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : मराठ्यांना दोन टप्प्यांत आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा; म्हणाले, ”जुन्या नोंदी आढळल्या त्यांची…”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 30 October 2023, 13:52

Big News : मुंबई : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. तर काही तरूणांनी मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलं. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मराठा समाजाने सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. आरक्षण देण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, सरकारला थोडा वेळ द्या, असे नम्र आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

सरकारला थोडा वेळ द्या, असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, क्युरेटिव्ह पिटीशन आणि शिंदे समितीच्या मार्गाने आम्ही हे आरक्षण देणार आहोत. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासणाऱ्या न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने पहिला अहवाल सादर केला आहे. त्यांनी एकूण १ कोटी ७३ लाख कागदपत्रे तपासली यामध्ये ११ हजार ५३० कुणबी नोंदी आढळल्या आहेत. न्यायमूर्ती शिंदे यांचा अहवाल उद्या (ता. ३१ ऑक्टोबर) कॅबिनेटमध्ये स्वीकारल्यानंतर महसूल मंत्री आणि संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला जाणार आहे. (Big News) त्यानंतर ज्यांच्या जुन्या नोंदी आढळल्या आहेत, त्यांची कागदपत्रे तत्काळ तपासून त्यांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला आहे. सरकारला थोडा वेळ द्या. आम्ही सकारात्मक आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मराठा समाज आणि राज्यातील जनतेचं लक्ष वेधलं. आम्ही मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देणार आहोत. (Big News) एक म्हणजे शिंदे समितीच्या माध्यमातून आम्ही आरक्षण देणार आहोत. उद्या कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही शिंदे समितीचा अहवाल स्वीकारणार आहे. हा अहवाल स्वीकारल्यानंतर महसूल मंत्री जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून कागदपत्र तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ही पिटीशन दाखल केली आहे. हा पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मजबूत आणि प्रभावीपणे मांडण्यासाठी तीन माजी न्यायामूर्तींची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, मराठा आंदोलन वेगळ्या दिशेने जात आहे. तरुण आत्महत्या करत आहेत, त्याचा विचार मराठा नेत्यांनी केली पाहिजे. जे नेते मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत, त्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसे करू नये. आत्महत्या, हिंसा करू नका. (Big News) मराठा समाजाबाबत लोकांच्या मनात सहानुभूती आहे. आंदोलनामुळे ही सहानुभूती जाऊ शकते. त्यामुळे या आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम कोण करतंय याचा विचार करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

ज्या लोकांच्या जुन्या नोंदी आढळल्या आहेत, त्यांना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. (Big News) शिंदे समितीने महिनाभर हैदराबादपर्यंत मराठा समाजाशी संबंधित दस्ताऐवज शोधण्याचे अथक काम केले आहे. या समितीला आतापर्यंत ११ हजार ५३० कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना उद्यापासूनच दाखले दिले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : माझ्या भावाचा जीव वाचवा, अन्यथा मी विष पिऊन मरेन… जरांगेंची अवस्था पाहून महिला आंदोलकाना अश्रू अनावर!

Big News : मराठा आरक्षणाचा विषय आला की दादा आजारी पडतात; जरांगे पाटलांच्या मुलीची टीका

Big News : ससूनच्या डीनची; ललित पाटीलवर ‘कृपा’ असल्याचा आणखी एक पुरावा उघड; पत्रात नक्की कोणता उल्लेख?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34
Next Post

tourist spots : भारतातील निसर्ग-सौंदर्याने पुरेपूर असणारे 'ही' पर्यटन स्थळे; मग सुट्टीत जाणार का आवर्जून...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.