Pune News : पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ३० लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर ४७ संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ८४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यभरात बेकायदा दारू विक्री व निर्मीती, साठवणूक यावर आळा घालण्यासाठी ही राबवण्यात आली आहे.
एमपीडीएअंतर्गत कारवाई
रमेश चव्हाण (४१, रा. येरवडा) याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. तर ३२ जणांविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यासाठी विभागाकडे अहवाल पाठवण्यात आला आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्कचे संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मोहन वर्दे, अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक एस. आर. पाटील, युवराज शिंदे, एस. बी. जगदाळे यांच्या पथकांनी कारवाई केली. जिल्ह्यातील हाथभट्टीनिर्मिती, साठवणूक, विक्री यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक..
Pune News | निमगाव म्हाळुंगी परिसरातून पाच किलो गांजा जप्त ; एकाला बेड्या, तर एकजण फरार
Pune Traffic | वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी या भागातील वाहतूकीत तात्पुरते बदल