जीवन सोनवणे
Bhor News : भोर : भोर तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या किकवी तलाठी कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून शासकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने कार्यालयाचा टाळे ठोकलेले दिसते. परिणामी ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे. याठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयाला ना बोर्ड, ना तक्रार पेटी… त्यामुळे हे नक्की तलाठी कार्यालयच आहे का? असा संभ्रम ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. किकवी तलाठी कार्यालयात मोठ्या प्रमाणात खातेदार येत असतात आणि तलाठी कार्यालयाला असलेले टाळे पाहून निराशेने परत जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
ग्रामस्थांना मनस्ताप
याबत तलाठी परमेश्वर जाधव यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी मी मंगळवारपासून (ता. १०ऑक्टोबर) रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. (Bhor News) शासकीय कामासाठी तलाठी कार्यालयाकडे धाव घेतली असता, तलाठी कार्यालय बंद असल्याने त्यांच्या हाती निराशा येत आहे. यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. तलाठी रजेवर असल्यावर वरिष्ठ मंडल अधिकाऱ्यांनी नागरिकांची व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे मत आहे.
किकवी तलाठी कार्यालयाच्या या भोंगळ कारभारामुळे किकवी तलाठी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या केंजळ, काळेवाडी, मोरवाडी, वागजवाडी, लोखरेवाडी येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. यावर खातेदारांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Bhor News) लवकरात लवकर वरिष्ठ मंडल अधिकारी, कापूरहोळ यांनी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी नागरिकांची विनंती आहे.
नागरिकांच्या गैरसोयीचा नक्कीच विचार केला जाईल. चार्ज कोणाकडे आहे, याची पडताळणी करून आजच तलाठ्यांना किकवी तलाठी कार्यालयाचा चार्ज दिला जाईल. याबाबतच्या सूचना मंडलाधिकाऱ्यांना देण्यात येतील.
– सचिन पाटील, तहसीलदार, भोरकिकवी शाखेतील तलाठी परमेश्वर जाधव हे रजेवर असून, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तात्पुरता सेवेचा चार्ज सारोळ्यातील तलाठी माधव केंद्रे यांच्याकडे दिला आहे.
– पांडुरंग लहारे, मंडल अधिकारी, किकवीमाझ्याकडे सारोळा आणि भोंगवली तलाठी कार्यालयांचा चार्ज आहे. किकवी शाखेचा चार्ज माझ्याकडे नाही आणि किकवी सजाबाबतचे कोणतेही पत्र त्यांच्याकडे नाही.
– माधव केंद्रे तलाठी, सारोळा
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : वरंध घाटात पुन्हा अपघात; कार ९० फूट खोल दरीत कोसळली
Bhor News : भाटघर धरण क्षेत्रात तरंगत्या दवाखान्याद्वारे आजपासून वैद्यकीय सेवा