जीवन सोनवणे
Bhor News : भोर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी टोलमुक्तीचा पवित्रा घेतल्याने भोर, वेल्हे, हवेली तालुक्यातील मनसैनिकांनी खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करत, कार्यकर्त्यांनी काही काळ टोल वसुली बंद पाडली. टोलनाक्यावर जाऊन टोल न भरताच छोटी वाहने सोडण्यात आली.
टोल वसुली पाडली बंद
पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर पुणे जिल्ह्यातील मनसैनिक आक्रमक झाले होते. मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडली. (Bhor News) पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर जाऊन टोल न भरताच छोटी वाहने सोडण्यास सुरुवात केली तसेच स्थानिक मुद्द्यावरून सुद्धा मनसे सैनिक आक्रमक झाले होते. त्यामुळे मनसेच्या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
खेड-शिवापूर टोलनाका तातडीने पीएमआरडी हद्दीच्या बाहेर हटवावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. ठरलेल्या निर्णयानुसार एमएच १२ क्रमांकाच्या वाहनांना दिलेली सूट कायम ठेवावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. याबाबत बाळा नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला. (Bhor News) राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होऊन, पुढचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन न करण्याचा आदेश या वेळी देण्यात आला. त्यानंतर मनसैनिकांनी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना समज देऊन आंदोलन मागे घेतले. ‘फास्टटॅग’च्या नावाखाली स्थानिकांकडून सक्तीने वसुली सुरू आहे, ती बंद करण्यात यावी, ‘फास्टटॅग’द्वारे स्थानिक वाहनधारकांना टोल भरावा लागल्यास जनता गप्प बसणार नाही, त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनावर असेल, अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी दिली.
या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, माजी पंचायत समिती सदस्य विलास बोरगे, वेल्हे तालुकाध्यक्ष दिगंबर चोरगे, संजय लोखंडे, शशिकांत वाघ, विंझर गावचे सरपंच विनायक लिमन, श्रीरामनगरचे अजित पवार, अमोल गायकवाड, विक्रम जगताप, रवींद्र घाडगे आदी मनसे सैनिक उपस्थित होते. (Bhor News) पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
टोल वसुली बंद झाली नाही, तर येत्या काळात राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर, टोलनाका जाळून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
– संतोष दसवडकर, पुणे जिल्हा अध्यक्ष, मनसेखेड शिवापूर टोलनाका या ठिकाणावरून स्थानिक वाहने मोफत सोडत आहोत. हा टोल नाका केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येत असून, येथे कुठल्याही प्रकारच्या वाहनांना टोलमाफी नाही.
– अमित भाटिया, व्यवस्थापक, खेड शिवापूर टोलनाका
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : वन अधिकारीहो, जरा लक्ष द्या; करंदीतील बिबट्याचा बंदोबस्त करा; ग्रामस्थांची आर्त साद