जीवन सोनवणे
Bhor News : भोर : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘एक तारीख, एक तास’ काढून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परंतु भोर तालुका पंचायत समितीला स्वच्छता अभियान दिनाचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. भोर पंचायत समितीच्या अवतीभोवती अद्यापही कचऱ्याचे ढीग आणि मद्याच्या बाटल्या दिसून येत आहेत. पंचायत समितीच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत असून, याबाबत चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पंचायत समितीच्या गलथान कारभाराबाबत नाराजी
शासकीय निमशासकीय कार्यालयांना जोडून सुट्टी आल्याने अनेक कर्मचारी पर्यटनासाठी आपल्या कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले, तर अनेक जण आपल्या मूळ गावी गेले. त्यामुळे तालुक्यातील काही कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आलेच नाही. (Bhor News ) भोर पंचायत समितीच्या आवारात वाढलेले गवत, पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच, इमारतीच्या दोन्ही बाजूस साठलेला कचरा तर कोपऱ्यांची जागा चक्क दारू व बियरच्या रिकाम्या बाटल्यांनी व्यापली आहे. स्वच्छता अभियानाचे वारे देखील येथे फिरकलेले नाही, याचाच प्रत्यय हे चित्र पाहून येत आहे.
भोर पंचायत समितीच्या अवतीभोवती केर-कचरा, गवत, दारूच्या बाटल्या अशी स्थिती असताना देखील पंचायत समितीचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना देखील स्वच्छता मोहिमेअंतर्गत हे स्वच्छ करता आले नाही, हे दुर्दैवच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (Bhor News ) रविवारी (ता. १) ‘एक दिवस, एक तास’ स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता केली, हे वरिष्ठ कार्यालयाला कसे सांगणार? हा खरा प्रश्न आहे. यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
याबाबत भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : शिवसेना (शिंदे गट) भोर तालुका प्रमुखपदी दशरथ जाधव..
Bhor News : नसरापूरच्या स्वच्छतेसाठी गाव एकवटले; ३५ टन कचऱ्याची विल्हेवाट
Bhor News : भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचा पर्यावरण पुरक उपक्रम