सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : शिंगे घासली, बाशिंगे लावली माढुळी बांधली, म्होरकी आवळली तोडे चढविले, कासारा ओढला घुंगुरमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा.
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा मोठा सण असलेला भाद्रपदी बैलपोळा दौंड तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या उत्साहात, आनंदात आणि शांततेत साजरा केला गेला. (Bhigwan News ) वर्षभर बळीराजाच्या शेतात राबणाऱ्या बैलांसाठीचा हा सण असून, आज बैलांना कामातून विश्रांती त्यांची पूजा करण्यात येते. त्यांना विविध रंग, झूल, शिंगाना, तुरे लावून बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
तक्रारवाडीचे माजी सरपंच भीमराव वाघ (पाटील), कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक यशवंत वाघ (पाटील) यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने यावेळी बैल व गाईचे लग्न लावताना मंगलाष्टके म्हणत विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर कावड कावड चांगभलं, पाऊस आला चाल पुढे ही पारंपरिक रीत पार पडली. (Bhigwan News ) पावसासाठी पाटील कुटुंबियांकडून साकडे घालण्यात आले.
बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये पुरणाच्या पोळीचे जेवण बनवून त्याची विधिवत पूजा करून त्यांना ही गोड नैवद्य देण्याची परंपरा आजही जपली जात आहे. जुन्या परंपरेनुसार पाटील मंडळींना प्रथम मान देऊन नंतर इतर शेतकऱ्यांचे सजविलेले बैल गावातून त्यांची मिरवणूक काढण्याची आजही परंपरा तक्रारवाडी गावात जपली आहे. (Bhigwan News ) संध्याकाळी गावातील देव देवतांचे दर्शन घेऊन घरी आल्या नंतर गावातील सुवासिनींनी त्यांना ओवाळले व त्यांना पुरणाची पोळी खाण्यास दिली. बैलपोळ्याच्या दिवशी प्रथम आपल्या लाडक्या बैलांना जेवू घातल्यानंतर घरातील मंडळींनी जेवण केले.
बैलपोळा साजरा करताना बदल
लहानपणी साजरा होणारा बैलपोळा आणि आजचा बैलपोळा सण साजरे करण्यात बदल झाले आहेत. आधुनिकीकरणात बैलांची संख्या कमी झाली. (Bhigwan News ) सजावटीचे आयते साहित्य मिळू लागले आहे. त्यामुळे आज केवळ पोळ्याच्या दिवशीच बैलपोळा सणाचा आनंद साजरा होतो. पूर्वी दोन तीन दिवस अगोदर तयारी चालू व्हायची.
– प्रवीण भीमराव वाघ, प्रसिध्द बांधकाम उद्योजक व शेतकरी
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत बनसुडे विद्यालयाचे घवघवीत यश
Bhigwan News : पळसनाथच्या अहिल्या शिंदेची कुस्ती स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी