जुन्नर: रविवारी शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये 47 जण जखमी झाले. 17 मार्च रोजी साजरा केल्या जाणाऱ्या शिवजयंतीच्या तयारी दरम्यान ही घटना घडली. शिवाई देवी मंदिर मार्गाजवळ सकाळी 9 वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला होता. आज छ. शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. दरम्यान, शिवजयंतीच्या तयारीसाठी अनेक लोक शिवनेरी किल्ल्यावर जमले होते. शिवनेरी किल्ल्यावर जमलेल्या काही तरुण पर्यटकांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारल्याने हि दुर्घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, काही जण म्हणत आहेत कि, शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या मशालींमधून निघालेल्या धुरामुळे हा हल्ला झाला असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, मधमाश्यांच्या हल्ल्याला अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. जसे कि, धूप, परफ्यूम आणि सौंदर्यप्रसाधनांमधून येणारा तीव्र सुगंध मधमाश्यांना आकर्षित करू शकतो. मधमाशांच्या पोळ्यांजवळ मोठा आवाज हे हि एक कारण असू शकते.
जखमींना जुन्नर येथील छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉ. जाहिद हसन यांनी पीडितांवर उपचार केले, ज्यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. बाधितांमध्ये घाटकोपर, राहुरी, रत्नागिरी, रायगड, खडकवासला, धुळे, ठाणे आणि मुंबई येथील पर्यटकांचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.