यवत : बकुळा सखाराम घोटाळे या मराठी वेबसिरीजची निर्मिती रुबाबदार महाराष्ट्र क्रिएशन निर्मित सागर शेलार यांनी केली आहे. 10 मे रोजी सुरु झालेली मराठी वेबसिरीज ‘रुबाबदार महाराष्ट्र क्रिएशन’ या युटूब चॅनेलवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या वेबसिरीजचे चित्रीकरण ग्रामीण भागात झाले असून सर्व कलाकार ग्रामीण भागातील असल्याने गावरान विनोद रसिकांना पहावयास मिळत आहे.
बकुळा सखाराम घोटाळे या मराठी वेबसिरीजचे दिग्दर्शक दौंड तालुक्यातील पारगाव येथील सागर शेलार यांनी केले आहे. आता पर्यंत दोन भाग त्यांच्या सिरीजचे प्रकाशित झाले आहे. सोशल मिडियावर प्रेक्षकांनी या वेबसिरीजला भरभरून दाद दिली आहे. सागर शेलार हे कला क्षेत्रात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. दौंड तालुक्यातील पारगाव येथील हा युवक ग्रामीण भागातील नवीन कलाकारांना या निमित्ताने संधी देत असतो. अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
ज्याला आवड असते त्याला नक्कीच सवड मिळते असे म्हणतात म्हणूनच आपली कला जोपासण्यासाठी कलाकार हा नेहमीच संधी शोधत असतो. शेलार यांनी नेहमीच ग्रामीण कलाकारांना संधी दिली आहे. ज्यांच्यात कला व आवड असेल त्यांनी कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल त्यांनी येऊन भेटावे असे आवाहन, सागर शेलार यांनी केले.
बकुळा सखाराम घोटाळे या मराठी वेबसिरीजचा प्रोमो प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता व एपिसोड दर रविवारी सकाळी 8.30 वाजता ‘रुबाबदार महाराष्ट्र क्रिएशन’ या युटूब चॅनेलवर प्रकाशित केला जातो अशी माहिती शेलार यांनी दिली.