उरुळी कांचन, (पुणे) : पुनर्वसन खरेदी क्षेत्राच्या ताब्यावरुन मूळ जमिनीची वहिवाट असलेल्या पंधराहून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा घेणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्याला जमाव जमवून शिवीगाळ करुन हातपाय मोडण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 454/2 मध्ये मंगळवारी (ता. 28) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंधराहून अधिक जणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अलंकार बाळासाहेब कांचन (वय-32, धंदा शेती, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन ता. हवेली) असे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्याचे नाव असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पंधराहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश भगवान कांचन, अमोल विठ्ठल कांचन, अविनाश विठ्ठल कांचन, रितेश भगवान कांचन, कैलास गोपाळ कांचन, धनाजी गोपाळ कांचन, पांडुरंग बाजीराव कांचन, निलेश पांडुरंग कांचन, सचिन वाल्मीक कांचन, तसेच कमल वाल्मीक कांचन, शोभा पांडुरंग कांचन, मीना सचिन कांचन, अमोल विठ्ठल कांचन, यांची पत्नी (पूर्ण नाव माहित नाही) अविनाश विठ्ठल कांचन, यांची पत्नी (पूर्ण नाव माहित नाही) सतीश भगवान कांचन, यांची पत्नी (पूर्ण नाव माहित नाही) रितेश भगवान कांचन यांची पत्नी (पूर्ण नाव माहित नाही) सर्व (रा. इरिगेशन कॉलनी उरुळी कांचन ता. हवेली) यांच्यावर बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 129, 115, 126, 351(2), 352 (3) 352 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन गट क्र. 454/2 मधील पुनर्वसन जमीन अन्य एका खरेदीदाराकडून पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांनी खरेदी केली आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन हद्दीतील जमीन गट नंबर 454 /2 मध्ये जेसीबीच्या सहाय्याने काम करीत होते. यावळी वरील सर्वांनी बेकायदा गर्दी जमावून शेतात येऊन अलंकार कांचन व जे. सी. बी. मशीन वरील चालक शेतात काम करत असताना जवळ आले.
दरम्यान, त्यातील काहीजन म्हणाले की, तू येथे परत दिसला तर तुझे हातपाय तोडू तू इथे थांबायचे नाही दिसायचे नाही ही जमीन आम्हीच घेणार आहोत. असे म्हणून कांचन व जे.सी.बी मशीन वरील चालक या दोघांना शिवीगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी अलंकार कांचन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील 15 हून अधिक जणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना एक शेतकरी म्हणाले, “या जमिनी संदर्भात न्यायालयात दावे सुरु असताना बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा घेतला आहे. सदर दाखल झालेली कारवाई ही उरुळी कांचन पोलिसांनी पूर्णपणे नि:पक्षने केली नसल्याचा आरोप मूळ वहिवाट असलेल्या व गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आमच्यावर दाखल झालेल्या अन्यायाची नोंद घेतली नसून कारवाई एकतर्फी केली आहे.
याबाबत बोलताना अलंकार कांचन म्हणाले, “सदर घटनेचा व्हिडीओ काढलेला आहे. त्याच ठिकाणावरून 112 ला फोन करून पोलिसांना माहिती दिलेली आहे. कोणालाही शिवीगाळ किंवा दमदाटी केलेली नाही. उलट त्या ठिकाणी आलेल्या महिलांनी शिवीगाळ केली आहे.