पुणे : पुण्यातील आंबेगाव परिसरात शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कुटुंबियांचा विश्वास संपादन करुन १९ लाख ९९ हजार २५५ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत ३१ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनिल नामदेव गडकर व किरण सुनिल गडकर (रा. आंबेगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे आहेत. हा प्रकार जुलै २०२३ ते आजपर्यंत घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन केला. तसेच वेळोवेळी फिर्यादीची पत्नी व मेव्हणा यांच्या खात्यावरुन ऑनलाईन एकूण १९ लाख ९९ हजार २५५ रुपये घेऊन कोणतीही नोकरी न लावता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भावड करीत आहेत.