– अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर शहरातील आनंद नागरी सहकारी पंतसंस्थेच्या रक्कमेची अपहार करणाऱ्या आरोपींची चारचाकी, दुचाकी वाहने शिरुर पोलीसांनी जप्त केले आहे. यामुळे पतसंस्थेत फसवणूक करणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. या प्रकरणी नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कारवाईमुळे अपहार करणाऱ्या अध्यक्षासह इतर आरोपींना हा मोठा झटका म्हणावा लागेल. याबाबत संजयकुमार राखाराम मुंडे, (वय 56, रा.लेजर टाऊन, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे, फिर्यादीच्या फिर्यादीवरून (दि. 31 डिसेंबर 2013 ते दि. 20 फेब्रुवारी 2020) या कालावधीमध्ये आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरूर या संस्थेमधील अध्यक्ष, भागीदार व कामगार यांनी मिळून कट रचला. तसेच खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेच्या सभासदांची व ठेवीदारांची एकुण 16 कोटी 70 लाख 54 हजार 361 रुपये किंमतीची फसवणुक केली असल्याची फिर्याद यांनी केलेल्या ऑडीट मध्ये निष्पन्न झाले. त्याबाबत त्यांचे फिर्यादीवरून (दि. 09 जुलै 2024) रोजी गुन्हा दाखल झालेला आहे.
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999 कायदया अंतर्गतवरील गुन्हयातील आरोपीत यांचे व त्यांचे फर्मचे नावे असलेले पंधरा लाख रुपये किमतीचा एक लाल रंगाचा ट्रक नंबर एमएच 12 पीक्यु 6884 ही मेघहंस सेल्स फर्मचे (अभयकुमार चोरडीया व प्रविण चोरडीया) यांचे नावे असलेले जप्त, 8 लाख रुपये किमतीचा एक पांढरे रंगाचा टेम्पो क्रमांक एमएच 12 एनएक्स 8639 ही मेघहंस सेल्स फर्मचे (अभयकुमार चोरडीया व प्रविण चोरडीया) यांचे नावे असलेले 8 लाख रुपये किमतीचा एक पिवळया रंगाचा टेम्पो क्रमांक एमएच 12 क्युडब्ल्यु 4537 ही मेघहंस हंसराज अॅन्ड सन्स फर्म चे (अभयकुमार चोरडीया, प्रविण चोरडीया व इतर यांचे नावे असलेले, 5 लाख रुपये किमतीचा एक पांढरे रंगाचा पिकअप क्रमांक एमएच 12 पीक्यु 6937 ही मेघराज हंसराज इंटरप्रायजेस फर्मचे (प्रविण चोरडीया) यांचे नावे असलेले, 4 लाख रुपये किमतीचा एक पांढरे रंगाचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती क्रमांक एमएच 12 डब्ल्यु एक्स 1114 ही मेघराज हंसराज इंटरप्रायजेस फर्मचे (प्रविण चोरडीया) यांचे नावे असलेले, 30 हजार रुपये किमतीचा एक पांढरे रंगाची होंडा एक्टीव्हा स्कुटी मो. सायकल क्रमांक एमएच 12 एच वाय 6132 ही प्रविण चोरडीया यांचे नावे असलेली, 30 हजार रुपये किमतीची एक पांढरे रंगाची टीव्हीएस स्कुटी मोटर सायकल क्रमांक एमएच 12 एल क्यु 7552 ही प्रितम प्रविण चोरडीया यांचे नावे असलेली, 40 हजार रुपये किमतीची एक ग्रे रंगाची होंडा स्कुटी मोटर सायकल क्रमांक एमएच 12 आरआर 6997 ही सविता चोरडीया यांचे नावे असलेली, 50 हजार रुपये किमतीचा एक काळया रंगाची टिव्हीएस जुपीटर स्कुटी मो. सायकल क्रमांक एमएच 12 पीके 6542 ही अभयकुमार चोरडीया यांचे नावे असलेली अशा एकूण चार चाकी दुचाकी मिळून 41 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार नितीन सुद्रिक, राहुल भवर, पोलीस अंमलदार आकाश नेमाने, वीरेंद्र सुंबे, ज्ञानदेव गोरे या पथकाने केली आहे.