पुणे : हडपसर ते कासूर्डी उड्डाणपूल यवतपर्यंत करावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी जिल्हा नियोजन बैठकीत केली असून पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या विविध विकास कामे व समस्यांवर चर्चा झाली.

बैठकीस जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा प्रशासनातील सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक विकास आराखड्यास यावेळी मंजूरी देण्यात आली. या माध्यमातून पुण्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
यावेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील नियोजित हडपसर ते कासुर्डी दुमजली उड्डाणपूल हा रेसकोर्स ते यवत पर्यंत करण्यात यावा यांसह शहराचे उपनगर होत असलेल्या लोणीकाळभोर पर्यंत मेट्रो मार्गीकेची आखणी करण्यात यावी, पुणे – सोलापूर व पुणे-नगर महामार्गवरील वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यात यावे तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतीसाठी संपूर्ण जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात यावे व आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी आदि मागण्या आमदार राहुल कुल यांनी यावेळी केल्या.







