पुणे : सरकारी विभागात नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नांदेडच्या लोहा नगरपरिषदेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

नांदेडच्या लोहा नगरपरिषदेत सिटी लेव्हल टेक्निकल सेल (CLTC) मधील विशेषज्ञ-सिव्हिल इंजिनिअर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नांदेड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.nanded.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सिटी लेव्हल टेक्निकल सेल (CLTC) मधील विशेषज्ञ-सिव्हिल इंजिनिअर.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : लोहा-नांदेड.
– शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनियर (बी.ई./बी.टेक./एम.टेक) मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक.
– वयोमर्यादा : 28-45 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय नगरपरिषद, लोहा जि. नांदेड.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता : mcloha18@gmail.com.







