पळसदेव प्रतिनिधी – संतोष पवार
पळसदेव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी /मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा पळसदेव तालुका इंदापूर येथील श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पळसदेव संचलित श्री. पळसनाथ उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १००% आणि कला शाखेचा निकाल ९५.२८ % लागल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक यांनी दिली . विज्ञान शाखेतील प्रविष्ट १०२ विद्यार्थ्यांपैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला कला शाखेतील प्रविष्ट १०६ विद्यार्थ्यांपैकी १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक ..
विज्ञान शाखा…
1)शिरसाट प्रिया किरण 68.00%
2)पाटील यशराज रामराव 67.83%
3)ढावरे साक्षी नितीन 65.33 %
विज्ञान शाखा
1)खाडे साईश मिलिंद 84.00 %
2) सारंगकर साक्षी देविदास 78.83%
3) शिंदे कृष्णा संजय 77.00%
कला शाखा…
1) जाधव मेघा विजय 83.50%
2)पतुले पायल चंद्रकांत 80.67%
3)घाडगे सुजल संभाजी 80.33%
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे , सचिव योगिराज काळे , शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी , विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक , पर्यवेक्षक संजय जाधव , सर्व शिक्षक शिक्षकेत्तर , ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे .