मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या मैत्री या निवासस्थानी एका बाजूने ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे ईडीने राऊत यांच्या दुसऱ्या घरीही छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे. यामळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
संजय राऊत यांना ईडीने याअगोदर पत्राचाळ प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने त्यांना अनेकवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी चौकशीसाठी सहकार्य न केल्याने ईडीचे पथक त्यांच्या भांडूपमधल्या मैत्री या निवासस्थानी आज सकाळी सात वाजता दाखल झाले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राऊत कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.
तर दुसरीकडे, संजय राऊत यांच्या संबंधीत दोन ठिकाणीच धाडी पडल्या आहेत. कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावर ईडीने छापा टाकला आहे. कांजूरमार्ग येथील मैत्री बंगला आणि दादर येथील गार्डन कोर्ट येथील घरावर हा छापा टाकला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. त्यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. जबाब नोंदवल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांना जर राऊत यांना कार्यालयात घेऊन जाऊन चौकशी करायची असेल. तर तसे ईडीचे अधिकारी करू शकतात. ईडीच्या कार्यालयात नेल्यानंतर अटक करायची की नाही, याचा निर्णय तिथेच घेतला जाईल,अशी माहिती सूत्रांनी दिली.