Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवसेनेचे फायरबँड खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीची (ED) ने ज्या “पत्राचाळ घोटाळा” मुळे धाड टाकली, तो पत्राचाळ घोटाळा आहे तरी नेमका काय ते वाचा…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 31 July 2022, 13:34

पुणे : शिवसेनेचे फायरबँड नेते खासदार संजय राऊत यांच्या घरावर रविवारी पहाटेपासुनच सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीची (ED) चे दहाहुन अधिकारी दाखल झाले आहेत. त्याच संजय राऊच यांच्या दुसऱ्या घरावरही ईडीने रेड टाकल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. खासदार संजय राऊत हे ईडीच्या चौकशीला वारंवार गैरहजर रहात असल्याने, ईडीचे अधिकारी राऊतांच्या घरी पोहोचले असल्याचं बोललं जात आहे.

पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ही धाड टाकल्याची माहिती आहे. त्यामुळे ईडीची (ED) ने ज्या “पत्राचाळ घोटाळा” मुळे धाड टाकली, तो पत्राचाळ घोटाळा आहे तरी नेमका काय ते पाहु..

गोरेगाव हद्दीतील पत्राचाळ जमीन घोटाळा एक हजार ३४ कोटी रुपयांचा असल्याचा आरोप आहे. पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ‘ईडी’च्या आरोपानुसार, बारा वर्षापुर्वी प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला, असा आरोप आहे.

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे ३ हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूंना, तरउर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ तसेच २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरित केल्याचा आरोप ईडीने केलेला आहे.

 

गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्तीय…

‘ईडी’ने पत्राचाळ घोटाळा प्रकरणात यापुर्वीच प्रवीण राऊत यांना ताब्यात घेऊन, चौकशी नंतर अटक केलेली आहे. प्रवीण राऊत हे गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाशी करार केला होता. ही चाळ तब्बल ४७ एकरांवर वसली असून तेथे ६२७ भाडेकरू आहेत. या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावीत, असा करार २०१०मध्ये करण्यात आला होता.

त्यानंतर प्रवीण राऊत यांनी हौसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे (एचडीआयएल, डीएचएफएफ समूहातील कंपनी) राकेश वाधवान, सारंग वाधवान व अन्य संचालकांना हाताशी घेत या चाळ पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) परस्पर अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली. याद्वारे त्यांनी बेकायदा तब्बल १,०७४ कोटी रुपये जमवले. त्याचवेळी पत्राचाळीचा एक इंचही पुनर्विकास केला नाही. त्याशिवाय याआधारे त्यांनी बँकेतूनही ९५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले.

प्रवीण राऊत यांनी “पत्राचाळ घोटाळा” प्रकरणातील कोट्यवधी रुपये इतर खात्यात वळवल्याचा आरोप…

दरम्यान प्रवीण राऊत यांनी “पत्राचाळ घोटाळा” प्रकरणातील कोट्यवधी रुपये त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केल्याचा आरोप ईडीने केलेला आहे. यापैकीच ८३ लाख रुपये खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केल्याचा आरोप ईडीने केला आहे. यातुन संजय राऊत यांच्यावर सध्याचे धाडसत्र ईडीने सुरु केलेले आहे. प्रवीण राऊत यांनी पाठवलेल्या पैशातुनच संजय राऊत यांच्या पत्नी, वर्षा राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला, असा ‘ईडी’चा संशय आहे.

याप्रकरणी वर्षा राऊत यांनाही ‘ईडी’ने नोटीस बजावली होती. त्यावेळी वर्षा यांनी ५५ लाख रुपये माधुरी यांना परत केले. परंतु त्यानंतर ‘ईडी’ने एप्रिल महिन्यात पालघरमधील जमीन, दादर येथील फ्लॅट व किहीम येथील आठ भूखंडांवर टाच आणली. यांतील भूखंड व जमीन प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे. तर दादर येथील फ्लॅट वर्षा संजय राऊत यांच्या मालकीचा आहे. तर काही भूखंड हे वर्षा राऊत व स्वप्ना सुजित पारकर यांच्या नावे आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09
Next Post

1 ऑगस्टपासून ‘हे’ पाच मोठे बदल, तुमच्या खिशाला बसणार फटका, काय आहे ते आताच जाणून घ्या!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp