Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 October 2026, 17:41

शिक्रापूर : आधी गोड बोलून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडील तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी बीड जिल्ह्यातून अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याच्याकडून चोरीला गेलेले दोन सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याची पानपोत असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अभिमान बाबू तुपे (वय ४९, रा. पिठ्ठी निरगुडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

करंदी येथील नंदा गणपत दरेकर (वय ५२) या २८ सप्टेंबर रोजी नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी खंडाळे येथे जात होत्या. शिक्रापूर येथील चाकण चौकात त्या वाहनाची वाट पाहत थांबल्या असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. गोड बोलून त्याने दरेकर यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना आपल्यासोबत येण्यास सांगितले.

त्यानंतर आरोपी दरेकर यांना चाकण चौकातून तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील सुपर बाजाराजवळील झाडाखाली घेऊन गेला. तेथे बोलत असताना आरोपीने त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या कापून घेतल्या. तसेच गळ्यातील सोन्याची पानपोतही काढून घेतली. त्यानंतर हातात सोन्यासारखे दिसणारे पितळेचे बिस्कीट देत हे तुमच्या सोन्यापेक्षा अधिक वजनाचे असल्याचे सांगितले आणि तो तेथून निघून गेला. बिस्कीट तपासल्यानंतर ते सोन्याचे नसल्याचे लक्षात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे दरेकर यांच्या लक्षात आले.

यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला. तपासादरम्यान पोलिस पथक बीड जिल्ह्यात पोहोचले आणि अभिमान तुपे याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.

 

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस फौजदार लहानु बांगर, पोलिस हवालदार बापू हाडगळे, विश्वंभर वाघमारे आणि शिवाजी चितारे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी चोरीला गेलेले तीन तोळे सोन्याचे दागिनेही हस्तगत केले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp