Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 October 2026, 20:31

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह पेपरफुटी, रखडलेल्या नोकरभरती आणि आयोगाच्या कारभारातील कथित अनागोंदीविरोधात पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या या आंदोलनाला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी संध्याकाळी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राऊत यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत मागे न हटण्याचे आवाहन केले.

“तरुणांनी बोलू नये, शिक्षित होऊ नये आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवू नये, असे सत्ताधाऱ्यांना वाटते. पण हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा, फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. अन्यायाविरोधात पेटून उठणे ही या मातीची शिकवण आहे,” असे राऊत म्हणाले. रोहित पवार हेही उद्याची पिढी वाचावी यासाठी विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसल्याचे त्यांनी सांगितले. “पुण्यातील हे आंदोलन महाराष्ट्राचे जंतर-मंतर आहे. मागे हटू नका. तुमच्या एकीने आयोगाचा अध्यक्ष नक्की हटवला जाईल आणि तुमच्या संघर्षाला यश मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकार विद्यार्थ्यांच्या आवाजाने घाबरले असूनही बहिरेपणाचे सोंग घेत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. “शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान गेले, आता नंबर एमपीएससी अध्यक्ष भीमनवार यांचा आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारकडून झाल्याचा आरोप करत, सरकार मनाने प्रामाणिक असते तर विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेतल्या असत्या, असेही ते म्हणाले. “जे सरकार शुद्ध पद्धतीने निवडणुका घेऊ शकत नाही, ते परीक्षा काय घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या घोषणांचा उल्लेख करत राऊत यांनी मिश्किल टिप्पणीही केली. “मी देशाचा प्रधानमंत्री झालो तर घोषणा लिहिणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार दिला असता,” असे ते म्हणाले. देशात एकेकाळी “वडिलांची पँट फाटली तरी मुलगा मोदी-मोदी करतो आहे” अशी परिस्थिती होती, मात्र आता बदल घडत असल्याचा दावा त्यांनी केला. “मुलांना अंधभक्त बनवण्याचे कारखाने सरकारने चालवले आहेत. पण अंधभक्तीचा गांजा आणि चरस उतरवण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. हा महाराष्ट्र लढणाऱ्यांचा आहे, षंढांचा नाही,” असे म्हणत त्यांनी तरुणांनी आत्मविश्वास कायम ठेवून संघर्ष सुरू ठेवावा, असे आवाहन केले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आळंदी म्हातोबाची येथे भरदिवसा घरफोडी; सुमारे 3 लाखांचा ऐवज लंपास

Tuesday, 27 October 2026, 13:08

लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 जमा होणार? सप्टेंबर-ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; दिवाळीनंतर पैसे मिळणार की प्रतीक्षाच?

Tuesday, 27 October 2026, 13:00

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर किती परिणाम? पुढील 3 दिवसांत काय घडणार? वाचा

Tuesday, 27 October 2026, 12:50

पीक विम्याचे अर्ज अपात्र ठरले? शेतकऱ्यांच्या पीक विम्याची पुन्हा होणार तपासणी; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Tuesday, 27 October 2026, 12:41

लग्नाच्या घरात अचानक मृत्यूचं तांडव! शेजाऱ्याशी वाद अन् पुढच्या काही क्षणांत 3 जणांची हत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 27 October 2026, 12:32

खेडमध्ये सोसायटीच्या मेंटेनन्सच्या वादातून पाच फ्लॅटचे पाणी कनेक्शन तोडले, एकावर गुन्हा

Tuesday, 27 October 2026, 11:52
Next Post

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp