Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

1 ऑगस्टपासून ‘हे’ पाच मोठे बदल, तुमच्या खिशाला बसणार फटका, काय आहे ते आताच जाणून घ्या!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 31 July 2022, 15:14
पुणे : ऑगस्ट महिन्यापासून अनेक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर आणि व्यवहारावर होणार आहे. त्यामुळे उद्यापासून (ता.१) होणाऱ्या संभाव्य बदलांची आताच माहिती करून घ्या जेणेकरून आयत्यावेळी तुमचा गोंधळ उडणार नाही. 1 ऑगस्टपासून तुमच्या आयुष्याशी संबंधित अनेक नियम (Rule) बदलणार आहेत.  बदलत असलेल्या नियमांमध्ये बँकिंग व्यवस्थेशी संबंधित नियमांचा (Bank Rules) समावेश आहे. एक ऑगस्टपासून कोणत्या पाच गोष्टी बदलणार आहेत.
गॅस सिलिंडर महाग होऊ शकतो
प्रत्येक महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे या महिन्यातही घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात वाढ होऊ शकते.
चेक व्यवहारात बदल
बँक ऑफ बडोदाने १ ऑगस्टपासून चेकमार्फत होणाऱ्या व्यवहारांसाठी नियम बदलले आहेत. ५ लाखांपेक्षा जास्त रक्कमेचे चेकच्या व्यवहारांसाठी पॉझिटीव्ह पे सिस्टिम अनिवार्य करण्यात आली आहे. चेक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकरी सन्मान निधीसाठी केवायसी गरजेचं
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचं आहे. असं न केल्यास शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेतील १२ वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ जवळील सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्या. किंवा शेतकरी स्वतः संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतील. १ ऑगस्टपासून शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकरी केवायसी करू शकणार नाही.
१८ दिवस बँका राहतील बंद
ऑगस्ट महिन्यात १८ दिवस बँका बंद राहणार आहेत. मोहरम, रक्षा बंधन, स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी या सर्वांच्या मिळून एकूण १८ दिवस बँक बंद राहणार आहे. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्ट्यांची यादी जरूर तपासा.
आयटीआर फाईल करणाऱ्यास दंड
३१ जुलैनंतर आयटीआर फाईल करण्याऱ्या करदात्याला दंड भरावा लागणार आहे. जर एखाद्या करदात्याचं वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याला ५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. जर, एखाद्या करदात्याचं वार्षिक ५ लाखांपेक्षा कमी असेल तर त्या करदात्याला एक हजार रुपये दंड भरावा लागेल.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09
Next Post

पुणे येथील रोटरी क्लब अमनोराचा स्तुत्य उपक्रम ; कारगिल शहीद दिनानिमित्त रक्तदात्यास केले हेल्मेटचे वाटप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp