Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 October 2026, 17:09

मुंबई: मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण (SIR) आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून देशभरात राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. केरळ सरकारने २० वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात आणि केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अर्थात KSTP मधील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून विजिलन्स चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे प्रकरण २००६ मधील आहे. त्यावेळी ज्ञानेश कुमार केरळ सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. जागतिक बँकेच्या निधीतून KSTP अंतर्गत अंगामाली ते तिरुवनंतपुरमदरम्यान एमसी रोडच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम मलेशियातील ‘पती-बेल’ कंपनी आणि भागीरथ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त उपक्रमाला देण्यात आले होते. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. या प्रकल्पाशी संबंधित मलेशियन सिव्हिल इंजिनिअर ली सी बीन यांनी मलेशियात परतल्यानंतर आत्महत्या केल्याचेही सांगितले जाते.

या प्रकरणाशी संबंधित २००६ मधील प्राथमिक दक्षता चौकशीच्या फाईली केरळच्या गृह विभागाने पुन्हा मागवल्या आहेत. KPCC नेते मलयिनकीझु वेणुगोपाल यांनी ३ ऑक्टोबर रोजी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी या प्रकरणात कारवाईचे निर्देश दिले.

तक्रारीच्या प्राथमिक तपासणीत आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्याशी चर्चा केल्यानंतर विजिलन्स अँड अँटी-करप्शन ब्युरोचे संचालक मनोज अब्राहम यांना कायद्यानुसार तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

दरम्यान, SIR आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावरून विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आधीपासूनच होत आहे. अशा परिस्थितीत २० वर्षे जुन्या KSTP प्रकरणातील चौकशीमुळे मुख्य निवडणूक आयुक्तांवरील राजकीय दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14
Next Post

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp