मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने घेतला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आता दरमहा ५०० रुपये मिळणार आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला.
कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेले निर्णय
– केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला
(महिला व बाल विकास)
– भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटींचा प्रस्ताव
(आदिवासी विकास विभाग)
– गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा
(अन्न व नागरी पुरवठा)
– आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार
(कौशल्य विकास )
– मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी (महसूल विभाग)
– महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द
(गृह विभाग)
– सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे
(सहकार विभाग)
– दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन
(विधी व न्याय विभाग)
– मंडणगड येथे दिवाणी न्यायालय
(विधी व न्याय विभाग)